शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

आंबेडकर स्मारकावरून वाढला असंतोष

By admin | Published: November 17, 2016 6:41 AM

ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मार्बल लावण्याचा महासभेचा निर्णय आयुक्तांनी गुंडाळून ठेवला आहे.

नामदेव मोरे / नवी मुंबई ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मार्बल लावण्याचा महासभेचा निर्णय आयुक्तांनी गुंडाळून ठेवला आहे. मार्बलऐवजी रंगच लावण्यात येणार असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सोमवारी ऐरोलीमध्ये झालेल्या स्मारक समितीच्या बैठकीमध्ये सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून वेळ पडली, तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने मार्च २०१६ मध्ये घेतला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असल्यामुळे त्याला रंग लावणे योग्य होणार नाही. स्मारकाला मकराना मार्बल लावण्याच्या प्रस्तावाला सर्वमताने मंजुरी देण्यात आली होती. निविदा प्रक्रियाही सुरू केली होती. स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अचानक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्बल लावण्याचा निर्णय रद्द केला. आयआयटीच्या मते मार्बल लावणे योग्य होणार नाही, खाडीकिनारी स्मारक असल्याने मार्बलचा रंग काळा पडण्याची शक्यता आयआयटीने व्यक्त केली. याशिवाय मार्बल पडून अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे पालिकेच्या खर्चामध्ये बचत झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. या निर्णयामुळे असंतोष वाढल्यामुळे काँगे्रस नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या मार्बलचे काम रद्द करून पैसे वाचवल्याचा गवगवा करणे योग्य नाही. स्मारकाच्या दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे प्रशासनाने मार्बल लावले जाईल, असे स्पष्ट केले होेते. सर्वसाधारण सभेतील लक्षवेधीनंतर मार्बल लावण्याचे काम मार्गी लागेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती; पण प्रशासनाने पुन्हा समिती गठीत केली. समितीने मार्बल योग्य नसल्याचा अहवाल दिल्याचे कारण देऊन पुन्हा मार्बल रद्द करण्यात आले आहे. मार्बल की रंग, या गोंधळामध्ये स्मारकाचे काम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी स्मारक समितीची बैठक मंगळवारी ऐरोलीमध्ये आयोजित केली होती. बैठकीला महापौर सुधाकर सोनावणे, आरपीआयचे अध्यक्ष सिद्राम ओहाळ, कमलाकर अहिरे, संजू वाडे, अंकुश सोनावणे, महेश खरे, चंद्रकांत जगताप, परमेश्वर गायकवाड, लक्ष्मण साळवे, बालाजी भालेराव, यशपाल ओहाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्मारकाला मार्बलच लागेल इतर कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही. जर प्रशासनाने लोकभावना विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्मारक समितीने दिला आहे. ४९ मीटर उंचीचा डोम : आंबेडकर स्मारकाच्या मुख्य इमारतीमध्ये ४९ मीटर उंचीचा डोम उभारण्यात आला आहे. बाबासाहेब विद्वत्तेचे प्रतीक आहेत. यामुळे डोमचा आकार पेनाच्या नीबप्रमाणे व उमलत्या कमळाप्रमाणे ठेवण्यात आला आहे. डोम हेच स्मारकाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. डोमला रंग लावण्यावर प्रशासन ठाम असून लोकप्रतिनिधी व जनतेने त्यासाठी मार्बलच बसवण्याचा आग्रह धरला आहे. मार्बल बसवले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्मारकाच्या उभारणीतील टप्पे च्सर्वसाधारण सभेमध्ये १० फेब्रुवारी २००९ ला प्रशासकीय मंजुरी च्१९ डिसेंबर २००९ रोजी प्रथम सुधारीत प्रशासकीय मंजुरी च्फेब्रुवारी २०१० मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये द्वितीय सुधारीत प्रशासकीय मंजुरीच्९ मार्च २०११ मध्ये स्मारकाच्या बांधकामाची निविदा मंजूर च्२६ जून २०१३ रोजी महासभेच्या अधीन राहून सुधारीत खर्चास मंजुरी