रुग्णवाहिका, अग्निशमनची रस्त्यावर अडवणूक सुरूच! दंडाची कारवाई कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:15 AM2022-08-22T07:15:43+5:302022-08-22T07:16:09+5:30

रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन यांना पुढे जाण्यासाठी प्राधान्य देण्यात अनेक वाहनचालक आडकाठी करताना दिसून येतात.

Ambulance fire brigade continues to block the road Penalty action only on paper | रुग्णवाहिका, अग्निशमनची रस्त्यावर अडवणूक सुरूच! दंडाची कारवाई कागदावरच

रुग्णवाहिका, अग्निशमनची रस्त्यावर अडवणूक सुरूच! दंडाची कारवाई कागदावरच

googlenewsNext

नवी मुंबई :

रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन यांना पुढे जाण्यासाठी प्राधान्य देण्यात अनेक वाहनचालक आडकाठी करताना दिसून येतात. लेनची शिस्त नसल्याने हे वाहनचालक संपूर्ण मार्ग अडवून ठेवतात. अशा वेळी पाठीमागून अग्निशमन किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येत असतानाही मार्ग तातडीने मोकळा केला जात नाही. 

शहरात बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येत भर पडत चालली आहे. रस्त्यावर वाहन पळवताना लेनची शिस्त पाळली जात नाही. शिवाय पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासदेखील प्राधान्य देत नाहीत. असाच प्रकार नवी मुंबईत ठिकठिकाणी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांबाबतही पाहायला मिळतो. 

वाहनचालकांना शिस्त लागणार कधी?
रुग्णवाहिकेतून नेली जात आलेली व्यक्ती मृत्यूच्या दाढेत असल्याने त्यास वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश वाहनचालकांमध्ये संयमाचा अभाव असल्याने रुग्णवाहिकेपेक्षा स्वतःच्या वाहनाला पुढे पळण्याची घाई दिसून येते.

रुग्णवाहिका अडवल्यास दंड
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवून ठेवल्यास संबंधिताला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. मोटर वाहन कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. तर दंड म्हणून नव्हे तर सुज्ञ व्यक्ती म्हणून प्रत्येक वाहनचालकाने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.

नियमांबाबतच चालकांमध्ये अज्ञान
अत्यावश्यक सेवेचा भाग असलेली रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन येत असल्यास त्यास पुढे जाण्यासही मार्ग दिला पाहिजे याबाबतचे ज्ञान चालकांमध्ये आवश्यक आहे. परंतु अनेकदा पाठीमागून रुग्णवाहिका येत असल्यास आपले वाहन बाजूला घेण्याऐवजी रुग्णवाहिकेच्या पुढे अधिक वेगाने पळवले जाते.

दंडवसुली कागदावरच
सिग्नलच्या ठिकाणी किंवा भररस्त्यात बेजबाबदारपणे वाहन चालवून रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन अडवून ठेवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. परंतु अनेकदा असे प्रकार नजरेसमोर असतानाही वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनांचे नंबर नोंद करून त्यांच्यावर कारवाईकडे कानाडोळा केला जातो.

Web Title: Ambulance fire brigade continues to block the road Penalty action only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.