नवी मुंबई : पामबीच रोडवरील तुटलेले व गंजलेले दिवाबत्तीचे खांब बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ८८ खांब बदलण्यासाठी व एलईडी दिवे बसविण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.महापालिका क्षेत्रातील प्रमुख रोड म्हणून पामबीचची ओळख आहे. कोपरी ते किल्ले गावठाण परिसरामध्ये या रोडवर ४३८ दिवाबत्तीचे खांब आहेत. यामधील २२ खांब तुटले असून ४७ खांब धोकादायक स्थितीमध्ये आहेत. सिडकोने २० वर्षांपूर्वी लावलेल्या विद्युत खांबांची स्थिती बिकट झाली आहे. खांब पडल्याने यापूर्वी अपघात झाले होते. याशिवाय सारसोळे जंक्शनवरून सानपाड्याकडे जाणाºया मार्गावरील लाइट बंद असल्याने वारंवार अपघात होऊ लागले आहेत. गंजलेले खांब तत्काळ बदलले नाहीत तर गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरसेवकांनीही याविषयी वारंवार आवाज उठविला होता. यापूर्वी झालेले अपघात व भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सर्व पामबीच रोडचे सर्वेक्षण करून एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.गंजलेले खांब बदलण्यासाठी ७६ लाख ४६ हजार रुपये खर्चास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. नगरसेवकांनीही हे काम लवकर करण्याची सूचना केली. कामांमध्ये नेरूळ सेक्टर ३८मधील तुटलेल्या ५२ खांबांचा समावेश आहे.>प्रस्तावित कामांचा तपशीलसाहित्याचा तपशील संख्या११ मीटर लांबीचे खांब फाउंडेशन ६९९ मीटर खांब फाउंडेशनसह 0९८ मीटर खांब फाउंडेशनसह १०डबल आर्म ब्रॅकेट्स १२३केबल ३५ चौरस मीटर १०५०केबल ९५ चौरस मीटर ८२०१७० व्हॅट एलईडी फिटिंग ७२ नग१०० व्हॅट एलईडी फिटिंग ५६ नग
पामबीच रोडला येणार नवी झळाळी, विद्युत व्यवस्थेसाठी ७६ लाख रुपयांची तरतूद; एलईडी दिवे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 2:48 AM