११ फुट लांबीच्या ४० किलो वजनाच्या अजगराने भटक्या कुत्र्याला गिळले; अजगराला जंगलात सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:46 PM2023-11-11T12:46:15+5:302023-11-11T12:46:30+5:30

संवेदनशील प्राणी मित्रांनी केले कुत्र्यावर अंत्यसंस्कार

An 11-foot-long, 40-kilogram python swallowed a stray dog; | ११ फुट लांबीच्या ४० किलो वजनाच्या अजगराने भटक्या कुत्र्याला गिळले; अजगराला जंगलात सोडले

११ फुट लांबीच्या ४० किलो वजनाच्या अजगराने भटक्या कुत्र्याला गिळले; अजगराला जंगलात सोडले

मधुकर ठाकूर

उरण : उरण -कळंबुसरे गावातील राईस मिलमध्ये दिवसाढवळ्या शिरूर भटक्या कुत्र्याला गिळलेल्या 
एका ११ फुट लांबीच्या इंडियन पायथॉन जातीच्या अजगराला चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी अजगराची सुटका करून त्याला इंद्रायणी जंगलातील नैसर्गिक मुक्त वातावरणात सोडून दिलेच.त्याशिवाय संवेदनशील प्राणी मित्रांनी  मृत कुत्र्यावर अंत्यसंस्कारही करून भुतं दयेचा पायंडा पाडला आहे.

 उरण तालुक्यातील कळंबूसरे गावातील बंद असलेल्या राईस मिलमध्ये शुक्रवारी (१०) १०.३० वाजताच्या सुमारास एक ११ फुट लांबीचा आणि ४० किलो वजनाचा इंडियन पायथॉन जातीचा अजगर घुसला.भक्षाच्या शोधार्थ दिवसाढवळ्या नागरी वस्तीत शिरलेल्या अजगरांना पाळीव कुत्र्याला गिळले. राईसमिलच्या शेजारीच असलेल्या शिवप्रसाद भेंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच परिचित असलेल्या चिरनेर येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी आणि सदस्य महेश भोईर, महेश ठाकूर यांनी लागलीच राईसमिलकडे धाव घेतली.कुत्र्याला गिळून निपचिप पडलेल्या अजगराला वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या प्रयासाने आणि शिताफीने पकडले .वनकर्मचारी संतोष इंगोळे, राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत चिरनेरच्या इंद्रायणी जंगलातील नैसर्गिक आवासात सोडून दिले.मृत भटक्या कुत्र्यालाही खड्डा खोदून गाडून टाकुनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: An 11-foot-long, 40-kilogram python swallowed a stray dog;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.