पनवेलमधील समस्यांचा लेखाजोखा
By admin | Published: August 26, 2015 11:06 PM2015-08-26T23:06:47+5:302015-08-26T23:06:47+5:30
पनवेल शहरामधील समस्या, स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर चारही बाजूंनी टीका सुरू आहे. नुकताच शहरातील ५0 संस्थांनी
पनवेल : पनवेल शहरामधील समस्या, स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर चारही बाजूंनी टीका सुरू आहे. नुकताच शहरातील ५0 संस्थांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत नगरपरिषदेचा निषेध केला होता. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून बुधवारी नगराध्यक्षा चारु शीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी शहरामधील समस्यांची पाहणी केली.
नगरपरिषदेच्या कामकाजावर शहरामधील नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न नगरपरिषदेला सोडविता आलेले नाहीत. शहरामधील समस्या दूर करण्याच्या दृष्टीने व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन केल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. यावेळी शहरामधील शिवाजी चौक परिसर, भाजी मार्केट, मच्छीमार्केट, कोळीवाडा, टपाल नाका परिसर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदींची पाहणी केली. शहरामधील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याचीही यावेळी दखल घेण्यात आली. या पाहणी दौऱ्यामध्ये नगराध्यक्षा चारुशीला घरत, गटनेते अनिल भगत, नगरसेवक राजू सोनी आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहरामधील अतिक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. हा गंभीर प्रश्न असून नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार आहे.
- मंगेश चितळे,
मुख्याधिकारी, पनवेल