ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:39 PM2023-09-12T20:39:56+5:302023-09-12T20:41:12+5:30

घोषणाबाजी निषेध, निदर्शने 

Angry locals, farmers, fishermen march against ONGC oil spill in uran | ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा

ONGC तेलगळती विरोधात स्थानिक संतप्त; नागरिक, शेतकरी, मच्छीमारांचा मोर्चा

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण : ओएनजीसी प्रकल्पातून झालेल्या तेल गळतीमुळे शेतीचे आणि मच्छिमारांचे नुकसान झाले असून या संदर्भात ओएनजीसी आणि तहसील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांनी मंगळवारी ओएनजीसी प्रकल्प प्रवेशद्वार आणि उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी गुरुवारी बैठकीचे आश्वासन देण्यात आले आहे. 

शुक्रवारी झालेल्या तेलगळतीमुळे येथील शेतपीक ,मासेमारी व्यवसायही बाधीत झाला आहे. या बाधीत शेतकरी आणि मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्यात स्थानिक प्रशासन व ओएनजीसी व्यवस्थापन  टाळाटाळ करीत आहे.उलट किरकोळ तेल गळतीमुळे मच्छीमार, भातशेतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याचा दावा ओएनजीसीने प्रशासनाने जाहीररीत्या केला आहे.यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांनी उरण येथील ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात ओएनजीसी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका पाटील,उरण पंचायत समितीचे माजी सभापती सागर कडू, वैभव कडू, जनार्दन थळी, आप्पा कडू, सिताराम घरत, महेंद्र ठाकुर , किसन घरत आदी मान्यवरांसह परिसरातील शेकडो शेतकरी, नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Angry locals, farmers, fishermen march against ONGC oil spill in uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.