पनवेल महापालिकेच्या सचिवपदी अनिल जगधनी, गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त होते पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:44 AM2017-09-07T02:44:15+5:302017-09-07T02:45:23+5:30
खासगी कारणावरून पनवेल महापालिकेचे प्रभारी नगरसचिव गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर महापालिकेचे सहायक उपायुक्त अनिल जगधनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल : खासगी कारणावरून पनवेल महापालिकेचे प्रभारी नगरसचिव गणेश साळवे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर महापालिकेचे सहायक उपायुक्त अनिल जगधनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर तत्कालीन उपायुक्त मंगेश चितळे यांच्या शिफारशीनुसार प्रशासन अधिकारी पदावर काम करणाºया गणेश साळवे यांची नियुक्ती नगरसचिव पदावर केली होती. साळवे यांच्यावर नगरसचिव पदासह अन्य चार विभागांचे काम होते. मात्र त्यांना कर्मचारी अपुरे असल्यामुळे कामाचा ताण वाढला होता.
पालिकेच्या आतापर्यंत पार पडलेल्या महासभेत विरोधकांसह सत्ताधाºयांनी त्यांना सतत टार्गेट केले होते. या साºया गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी खासगी कारण पुढे करत आयुक्तांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी अनिल जगधनी हे नव्याने पनवेल महानगर पालिकेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.