अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा देणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 11:37 AM2018-09-25T11:37:58+5:302018-09-25T11:46:28+5:30
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचं नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित असून अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेट दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावेळी माथाडी कायदा देशात लागू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून 52 हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांसाठी 2600 घरे आरक्षित असून पुढील तीन महिन्यात अजून 50 हजार घरांचे नियोजन करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माथाडी कायद्याला 50 वर्ष झाली आहेत. हा कायदा देश पातळीवर राबविला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत माथाडी मेळावा घ्यावा व कामगार हिताचा कायदा देश पातळीवर राबवावा असे आवाहन माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे.