पनवेल पालिकेचा सुधारित अर्थसंकल्प जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:31 AM2017-12-30T02:31:37+5:302017-12-30T02:31:45+5:30

पनवेल महानगरपालिकेचे २०१७-२०१८ चे सुधारित अंदाजपत्रक मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केले.

Announcement of revised budget for Panvel Municipal | पनवेल पालिकेचा सुधारित अर्थसंकल्प जाहीर

पनवेल पालिकेचा सुधारित अर्थसंकल्प जाहीर

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे २०१७-२०१८ चे सुधारित अंदाजपत्रक मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी शुक्रवारी स्थायी समितीसमोर सादर केले. पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा सुधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी प्रशासनाने फुगवलेला एक हजार ३५ कोटींचा अर्थसंकल्प ४३८ आला आहे. या अर्थसंकल्पात कचºयासाठी ५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सुधारित अंदाजपत्रकात चालू वित्तीय वर्षाचा म्हणजे २०१७-१८चा प्रत्यक्षात प्राप्त उत्पन्नाचा अंदाज घेण्यात आला असून, सुधारित करण्यात आला आहे. २०१७च्या सुधारित अर्थसंकल्पात (शिल्लक धरून) एकूण खर्च ४३८.१२ कोटी प्रस्तावित केली असून, अखेरची शिल्लक ७१.०८ कोटी प्रस्तावित केली आहे. यामध्ये एकत्रित मालमत्ता कर ५७.६० कोटी, एलबीटी ९०.०० कोटी, विकास शुल्क १५ कोटी, मुद्रांक शुल्क २४.०० कोटी, १४व्या वित्त आयोगाचे ५०.०० कोटी एलबीटी, शासन अनुदान २० कोटी व रस्ते दुरु स्तीचे १५ कोटी अशा महसुली जमा धरल्या असून, त्यामध्ये शासनाकडून विविध बाबींसाठी येणाºया ६०.७० कोटी व भांडवली जमा ७.५० कोटींचा समावेश करण्यात आला आहे.
>अर्थसंकल्प वास्तववादी आहे. यापूर्वी प्रशासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा फुगविण्यात आला होता. मात्र, या अर्थसंकल्पात घनकचरा व्यवस्थापनासाठी ५७ कोटींची तरतूद केली असल्याने या गोष्टीचा फटका इतर विकासकामांना बसणार आहे.
- हरेश केणी,
स्थायी समिती सदस्य, शेकाप
आज मांडलेला अर्थसंकल्प हा सुधारित अर्थसंकल्प आहे. प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात दुरु स्ती करण्यात आली आहे.
- अमर पाटील,
सभापती, स्थायी समिती

Web Title: Announcement of revised budget for Panvel Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल