उरण : येथील एपीएम टर्मिनल (मर्स्क) मध्ये पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेसच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाºया ९९ कामगारांना कामावरून कमी केले आहे. ठेकेदाराच्या निर्णयाविरोधात कामगारांनी २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले होते. ठेकेदार कंपनीच्या कामगारांच्या बेकायदा संपामुळे कंटेनर हाताळणीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदाराला नोटीस बजावत, १२ तासांत काम पूर्ववत सुरू न केल्यास ठेकेदारीचे कंत्राटच रद्द करण्याची नोटीस देऊन इशारा दिला आहे.येथील द्रोणागिरी नोडमध्ये एपीएम (मर्स्क) कंपनीचे कंटेनर टर्मिनल आहे. एपीएम या बहुराष्टÑीय कंपनीचे बहुतांश कंटेनर हाताळणी आणि इतर कामे ठेकेदारी पद्धतीवर देण्यात आली आहेत. पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीकडे हाताळणीचे काम कमी झाले आहे. त्याशिवाय कामगारही असहकाराची भूमिका घेत असल्याने कामाची गती मंदावली आहे. कामगारांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे तेच काम कंपनीच्या दुसºया माथाडी कामगारांकडून करून घ्यावे लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम जाणवत आहे. त्यामुळे कंपनीने कामगार कपातीचे धोरण अवलंबिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पर्ल फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदारीवर काम करणाºया कंपनीने ९९ कामगारांना कमी केले आहे. त्याविरोधात २ फेब्रुवारीपासून एपीएम टर्मिनलमध्ये ठेकेदारीत काम करणाºया कामगारांनी संपाचे हत्यार उगारले आहे. सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे मात्र एपीएम कंटेनर टर्मिनल हाताळणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदारी पद्धतीवर काम करणाºया कामगारांचा संप बेकायदा ठरवत ठेकेदार कंपनी पर्ल्स फ्रेंट्स सर्व्हिसेस कंपनीच्या संचालक जमशेद अश्रफ यांनाच नोटीस धाडलीआहे. कंपनीच्या कामगारांनी बेकायदा सुरू केलेला संप १२ तासांत चर्चा करून मागे घ्यावा. अन्यथा, पर्ल्स फ्रेंट्स कंपनीचे कंत्राटच रद्द करण्याचा निर्वाणीचा इशारालेखी पत्राद्वारे एपीएम टर्मिनल (मर्स्क) व्यवस्थापनाने दिलाआहे.मात्र, कंपनी व्यवस्थापक, कामगार संघटनेचे पदाधिकारी, पर्ल्स फ्रेंट्स सर्व्हिसेस या ठेकेदारी कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.>एपीएम टर्मिनल व्यवस्थापनाने ठेकेदार कं पनीलाही नोटीस बजावून, १२ तासांत काम सुरू करण्यास सांगितले आहे.
संपकरी कामगारांना एपीएम टर्मिनलची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:41 AM