शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एपीएमसी निवडणुका विधानसभेनंतर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:44 PM

पाच वर्षांचा विलंब; प्रशासनाने न्यायालयात सादर केले वेळापत्रक

- नामदेव मोरे नवी मुंबई : पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बाजारसमितीच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असून, २९ फेब्रुवारी, २०२०ला मतदान होणार आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. देशभरातून कृषी माल याठिकाणी विक्रीसाठी येत असतो. येथील पाच प्रमुख मार्केटमधून वर्षाला १० ते १५ हजार कोटी रूपयांची उलाढाल होत असून १ लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. मागील काही वर्षांपासून बाजारसमितीमधील अडचणी वाढत चालल्या आहेत. डिसेंबर २००८ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती. डिसेंबर २०१३ ला संचालक मंडळाची मुदत संपली परंतु शासनाने पुन्हा निवडणूक वेळेत घेतली नाही. एक वर्ष विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. याविषयी व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये प्रशासकाची नियुक्ती केली. प्रशासकांची नियुक्ती केल्यानंतर एक वर्षात निवडणूका होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात निवडणूका न घेता प्रशासकांना मुदत वाढ देण्यात आली. उच्च न्यायालयाने प्रशासकीय मंंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली होती. १० लाख रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या कामाला न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे पाच वर्षामध्ये महत्वाची कामे करता आली नाहीत. न्यायालयानेही शासनाला निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम तयार करून तो न्यायालयात सादर केला आहे. यामुळे पाच वर्षांपासून रखडलेल्या निवडणूका पुन्हा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूका झाल्या की याविषयीची कार्यवाही सुरू होणार आहे. ३० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. २४ जानेवारी २०२० पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात केली जाईल.रखडलेले प्रश्न मार्गी लागणारएपीएमसीमधील प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे बाजारसमितीमधील अनेक महत्वाचे प्रश्न रखडले आहेत. नवीन कोल्ड स्टोरेज, मॅफ्को कडून मिळालेल्या भूखंडाचा विकास, कांदा बटाटा मार्केटची पुनर्बांधनी, फळ मार्केटमधील नवीन इमारतीमधील जागा वाटप, भाजी मार्केटच्या बाजूला बांधलेले नवीन मार्केटमधील गाळ्यांचे वितरण व इतर प्रश्न निवडणूका झाल्यानंतर मार्गी लागू शकतात.पूर्वीची रचना कायम राहणार : संचालक मंडळाची पूर्वीचीच रचना कायम राहणार आहे. प्रत्येक महसूल विभागातून प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ शेतकरी प्रतिनिधी, पाच व्यापारी प्रतिनिधी, एक माथाडी कामगार प्रतिनिधी, मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी व पाच शासननियुक्त प्रतिनिधी अशीच रचना राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019