एपीएमसीत सुरू आहे बदल्यांचा ‘बाजार’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:27 PM2018-10-23T23:27:23+5:302018-10-23T23:27:33+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बदल्यांचा ‘बाजार’ सुरू झाला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बदल्यांचा ‘बाजार’ सुरू झाला आहे. धान्य व मसाला मार्केटमध्ये तब्बल १२ वर्षे ८ महिने काम केलेल्या अभियंत्याला पुन्हा धान्य मार्केटमध्येच पाठविण्यात आले आहे. या बदलीमध्ये राजकीय वशिलेबाजी झाल्याचा आरोप केला जात असून पुन्हा एकदा पक्षपाती कामकाजावरून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील उपसचिव नामदेव जाधव यांना लाचलुचपत विभागाने अटक केल्यानंतर मार्केटमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजी मार्केटमधील विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी तेथील जबाबदारी कोणावर द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता. मसाला मार्केटमधील उत्पन्न दुप्पट करण्यात यश मिळविलेल्या डी. जी. माकोडे यांना भाजी मार्केटला पाठविण्यासाठी चाचपणी सुरू झाली होती. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची फळ मार्केटमध्ये बदली केली होती. हाही माकोडे यांच्यावर अन्यायच होता. अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर प्रशासनाने त्यांना मसाला मार्केटमध्ये कायम ठेवले. परंतु त्यानंतर अभियांत्रिकी विभागाच्या केलेल्या बदल्यानंतर पुन्हा वादळ उठले आहे. विशेषत: भाजी मार्केटमधील एस. व्ही. देशमुख यांची धान्य मार्केटमध्ये बदली करण्यात आली आहे. या बदलीवरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. देशमुख २००६ ते एप्रिल २०११ सहा वर्षे धान्य मार्केटमध्ये होते. एप्रिल २०११ ते मे २०१६ मध्ये पाच वर्षे मसाला मार्केटमध्ये कार्यरत होते. जून २०१६ ते जानेवारी २०१८ मध्ये १ वर्ष ८ महिने पुन्हा धान्य मार्र्केटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या एकूण कार्यकाळात तब्बल १२ वर्षे ८ महिने मार्केट एक किंवा दोनमध्येच त्यांनी काम केले आहे.
एपीएमसीमधील सर्वात प्रमुख मार्केट म्हणून धान्य व मसाला मार्केटचा समावेश आहे. या दोन मार्केटमध्येच देशमुख यांची वारंवार वर्णी लागली जात असल्यामुळे नाराजीमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय या बदलीमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचीही चर्चा आहे. सचिव व अध्यक्षांनी दबावापोटी या बदल्या केल्या आहेत.
या सर्व चर्चांमुळे बाजार समितीमध्ये नाराजीचा स्वर उमटला आहे. एका अभियंत्याने त्याच्यावर बदल्यांसंदर्भात झालेल्या अन्यायाविषयी प्रशासक व सचिवांना पत्रही दिले आहे. अभियांत्रिकी विभागाच्या कामकाजाविषयी यापूर्वीही इतर अधिकारी कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये आता बदल्यांमुळे पुन्हा नाराजी वाढू लागली आहे.
प्रशासनाने बदल्यांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र एक ज्येष्ठ आमदार व ज्येष्ठ मंत्र्यांच्या दबावामुळेच बदली झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
>दबावामुळेच बदली
प्रशासनाने बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात एका मोठ्या अधिकाºयाने अधिकारी व कर्मचाºयांशी बोलताना दबाव असल्याचे मान्य केले होते. कर्मचारी संघटना,कर्मचाºयांनी सचिव व अध्यक्षांना याविषयी माहिती दिली होती. सचिव अनिल चव्हाण हेही निष्पक्षपणे काम करत आहेत. अनेक वेळा स्वत:चे वाहन स्वत: चालवत असतात. परंतु त्यांच्यावरही दबाव येऊ लागल्याची चर्चा सुरू आहे. आता प्रशासक सतीश सोनी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.सर्व मार्केटना लाभ व्हावा
बाजार समितीमधील बदल्यांमुळे गोंधळ सुरू आहे. कनिष्ठ अभियंता एस. व्ही. देशमुख अनेक वर्षांपासून धान्य व मसाला मार्केटमध्ये काम करत असल्यामुळे आक्षेप घेतला जात आहे. वास्तविक यामुळे देशमुख यांच्या वैयक्तिक प्रतिमेवरही परिणाम होऊ लागला आहे. देशमुख हे चांगले अधिकारी आहेत. अशाप्रकारे चांगले काम करणाºया अधिकाºयाच्या अनुभवाचा लाभ प्रत्येक मार्केटला झाला पाहिजे. मसाला व धान्य वगळता इतर मार्केटमध्ये त्यांना संधी दिली जावी जेणेकरून तेथील कामेही चांगली होतील, असे मत काही अधिकारी व कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.
>अभियांत्रिकी विभागातील बदल्या प्रशासकीय कारणांसाठी केल्या आहेत. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव नाही.
- अनिल चव्हाण,
सचिव, बाजार समिती