आरटीओच्या वाहनांमुळे एपीएमसीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:12 PM2018-12-03T23:12:40+5:302018-12-03T23:12:48+5:30
मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह टप्पा दोनच्या संरक्षण कुंपणावर आरटीओ प्रशासनाने भंगार वाहने ठेवली आहेत.
नवी मुंबई : मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह टप्पा दोनच्या संरक्षण कुंपणावर आरटीओ प्रशासनाने भंगार वाहने ठेवली आहेत. यामुळे संरक्षण कुंपण वाकले असून याकडे बाजारसमिती प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. इमारत आवारामधील कचरा सफाईही वेळेवर केली जात नाही.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या जवळच बँक व इतर कार्यालयांसाठी स्वतंत्र मध्यवर्ती सुविधागृह इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करू लागले आहे. देखभालीअभावी इमारती मोडकळीस आल्या आहेत. इमारतीच्या चारही बाजूला प्रशासनाने लोखंडी कुंपण केले आहे. कुंपणाला लागून आरटीओचे चाचणी मैदान आहे. या मैदानाच्या कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने ठेवली आहेत. बाजार समितीच्या कुंपणावरही वाहने टाकण्यात आल्यामुळे कुंपण तुटले आहे. ही नुकसानभरपाई आरटीओकडून वसूल करणे आवश्यक आहे. पण प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे कर्मचाºयांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. या इमारतीच्या आवारामध्ये ठिकठिकाणी कचºयाचे ढीग ठेवण्यात आले आहेत. परिसराची साफसफाई करून साठलेला कचरा कोपºयात ठेवला जात आहे. अस्वच्छतेमुळे या इमारतीमध्ये राहणाºयांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या कर्मचाºयांनीही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. देखभाल शाखेचे स्वत:च्या मालमत्तांकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. इमारतीमधील कार्यालयांचे नूतनीकरण करण्यासाठीही प्रशासनाची परवानगी घेतली जात नाही. अनेक व्यावसायिकांनी नूतनीकरण करून बांधकामाचा कचरा परिसरातच टाकला आहे. संंबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बाजारसमितीचे कर्मचारी या इमारतीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
>आरोग्य धोक्यात
आरटीओच्या भूखंडावरील भंगार वाहने, मध्यवर्ती सुविधागृह परिसरातील कचºयाचे ढीग व साफसफाईकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे डासांची संख्या वाढत आहे. याठिकाणी काम करणाºयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून इमारत परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होवू लागली आहे.