एपीएमसीचे मार्केट झाले चकाचक

By admin | Published: January 29, 2017 02:28 AM2017-01-29T02:28:12+5:302017-01-29T02:28:12+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे.

APMC market became shocking | एपीएमसीचे मार्केट झाले चकाचक

एपीएमसीचे मार्केट झाले चकाचक

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे. विशेषत: भाजी व फळ मार्केटच्या गाळ्यांवर कामगारांसाठी उभारलेल्या झोपड्याही हटविण्यात आल्या आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छतेमध्येही देशात सर्वोत्कृष्ट ठरावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासक मनोज सौनिक, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार, कार्यकारी अभियंता आर. आर. खिस्ते, एस. एम. मोहाडे, स्वच्छता अधिकारी एस. एन. कटकधोंड यांनी सलग १५ दिवस विशेष मोहीम राबविली आहे. फळ व भाजी मार्केटच्या गाळ्यांवर बांबू व प्लास्टीकचा वापर करून झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. भाजी, फळ ठेवण्याचे प्लास्टीकचे क्रेट्स व इतर साहित्य ठेवले होते. अनेक ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. हे सर्व अतिक्रमण हटविण्यात आले आहे. २० वर्षांमध्ये प्रथमच गाळ्यांवरील झोपड्या हटविल्या गेल्याने मार्केट स्वच्छ दिसू लागले आहे. मार्केटमध्ये नियमित कचरा उचलला जातो, पण यानंतरही अनेक ठिकाणी डेब्रिजचे ढीग व इतर साहित्य पडलेले असते. हा सर्व कचराही हटविण्यात आला आहे. मसाला, धान्य मार्केटमधील डेब्रिजही हलविण्यात आले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. पण मार्केटमध्ये स्वच्छता ठेवली जात नव्हती. प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने स्वच्छतेवर विशेष लक्ष दिल्याने आता पाचही मार्केट कचरामुक्त होवू लागली आहेत.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक, सचिव व अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. मार्केट कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न असून अशाच प्रकारचे साफसफाई नियमितपणे ठेवली जाणार आहे.
- आर. आर. खिस्ते, कार्यकारी अभियंता, एपीएमसी

Web Title: APMC market became shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.