शहरं
Join us  
Trending Stories
1
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
5
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
6
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
7
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
8
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
9
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
10
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
11
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
12
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
13
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
14
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
15
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
16
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
17
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
18
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
19
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
20
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

एपीएमसीचे मार्केट झाले चकाचक

By admin | Published: January 29, 2017 2:28 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये विशेष साफसफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाचही मार्केटमधील सर्व कचरा उचलण्यात आला आहे. विशेषत: भाजी व फळ मार्केटच्या गाळ्यांवर कामगारांसाठी उभारलेल्या झोपड्याही हटविण्यात आल्या आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छतेमध्येही देशात सर्वोत्कृष्ट ठरावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासक मनोज सौनिक, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार, कार्यकारी अभियंता आर. आर. खिस्ते, एस. एम. मोहाडे, स्वच्छता अधिकारी एस. एन. कटकधोंड यांनी सलग १५ दिवस विशेष मोहीम राबविली आहे. फळ व भाजी मार्केटच्या गाळ्यांवर बांबू व प्लास्टीकचा वापर करून झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. भाजी, फळ ठेवण्याचे प्लास्टीकचे क्रेट्स व इतर साहित्य ठेवले होते. अनेक ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आले होते. हे सर्व अतिक्रमण हटविण्यात आले आहे. २० वर्षांमध्ये प्रथमच गाळ्यांवरील झोपड्या हटविल्या गेल्याने मार्केट स्वच्छ दिसू लागले आहे. मार्केटमध्ये नियमित कचरा उचलला जातो, पण यानंतरही अनेक ठिकाणी डेब्रिजचे ढीग व इतर साहित्य पडलेले असते. हा सर्व कचराही हटविण्यात आला आहे. मसाला, धान्य मार्केटमधील डेब्रिजही हलविण्यात आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. पण मार्केटमध्ये स्वच्छता ठेवली जात नव्हती. प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने स्वच्छतेवर विशेष लक्ष दिल्याने आता पाचही मार्केट कचरामुक्त होवू लागली आहेत.बाजार समितीचे मुख्य प्रशासक, सचिव व अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही मार्केटमध्ये विशेष स्वच्छता मोहीम सुरू आहे. मार्केट कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न असून अशाच प्रकारचे साफसफाई नियमितपणे ठेवली जाणार आहे. - आर. आर. खिस्ते, कार्यकारी अभियंता, एपीएमसी