एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:59 PM2020-08-17T23:59:10+5:302020-08-17T23:59:30+5:30

तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.

APMC supplied 6 lakh tonnes of foodgrains | एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

एपीएमसीने पुरविले ६ लाख टन अन्नधान्य

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च ते आॅगस्ट पाच महिन्यांत ७३,५४० वाहनांमधून कृषिमाल मार्केटमध्ये आला आहे. तब्बल ६ लाख ६९ हजार टन अन्नधान्य पुरविण्यात यश आले असून, एपीएमसीच्या दक्षतेमुळे महामारीच्या काळात अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फैलाव मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये झाला. २१ मार्चला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर या परिसरातील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले, परंतु या परिसरातील दीड कोटी नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करता यावा, यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर व्यापारी व कामगारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मार्केट बंद करण्याची मागणी करण्यात आली. नवी मुंबईमध्ये बाजारसमितीमुळे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त पसरू लागल्यानंतर, शहरवासीयांमध्येही असंतोष निर्माण होऊन मार्र्केट बंद ठेवण्यासाठी दबाव वाढू लागला. दहा दिवस मार्केट बंदही ठेवावे लागले, परंतु मार्केट बंद ठेवल्यास धान्यपुरवठा करणारी दुसरी यंत्रणा नसल्यामुळे शहरवासीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली व पुन्हा मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाजारसमिती प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून मार्केटमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मास स्क्रीनिंग मोहिमेपासून अँटिजेन चाचणीपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सॅनिटायझरपासून आॅक्सिजन लेव्हल तपासणे व निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. व्यापारी संघटना, माथाडी कामगार नेते या सर्वांना विश्वासात घेऊन सर्व मार्केट सुरू ठेवली. २१ मार्च ते ३१ जुलै अखेरपर्यंत पाच मार्केटमध्ये ७३,५४० वाहनांची नोंद झाली. या काळात ६ लाख ६९ हजार २२६ टन मालाची आवक होऊन, तो मुंबई, नवी मुंबईमधील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आला. ९३ हजार ४४५ टन कांदा, बटाटा, १ लाख ४ हजार टन भाजीपाला, १,८५८ टन भाजीपाला, १ लाख १४ हजार टन सुखामेवा व मसाल्याचे पदार्थ, २ लाख ३४ हजार टन धान्य पुरविले आहे. सुरुवातीच्या काळात झालेली महागाईही नियंत्रणात आणण्यात यश मिळविले.
।कृत्रिम भाववाढही नियंत्रणात
सुरुवातीच्या काळात किरकोळ व्यापाऱ्यांनी दर वाढविले, परंतु बाजारसमितीने पुरेसा साठा असल्याचे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृत्रिम भाववाढही नियंत्रणात आली. बाजारसमिती सुरू झाली नसती, तर मुंबई व नवी मुंबईकरांना धान्यपुरवठा करणे सरकारसाठी अशक्य झाले असते.
>महिनानिहाय एपीएमसीमधील आवक (टन)
मार्केट २१ ते ३१ मार्च एप्रिल मे जून जुलै
कांदा मार्केट ९,००० १८,४७९ ११,३०५ २२,४३९ ३२,२२१
भाजीपाला ४,६७८ ४,६७८ २०,६१३ ३८,४५८ ३६,४०४
फळ मार्केट ५,६२५ ३४,४२९ १९,०८७ १३,९२४ ३६,४५४
मसाला मार्केट १,६०४ २७,६२४ २५,२३२ ३४,८४० ३८,११२
>कोरोनाच्या काळात मुंबई व नवी मुंबईकरांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर होती. सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार व वाहतूकदारांना विश्वासात घेऊन आम्ही विविध उपाययोजना केल्या. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे करण्यात यश आले.
- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती

Web Title: APMC supplied 6 lakh tonnes of foodgrains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.