एपीएमसीत बदल्यांचा ‘बाजार’?

By admin | Published: July 10, 2015 03:18 AM2015-07-10T03:18:38+5:302015-07-10T03:18:38+5:30

मोक्याच्या जागेवर चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते एपीएमसी मुख्यालयापर्यंत अनेकांचे अभय मिळत आहे.

APMC transfer 'market'? | एपीएमसीत बदल्यांचा ‘बाजार’?

एपीएमसीत बदल्यांचा ‘बाजार’?

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कर्मचारी ६ ते ७ वर्षे एकाच विभागात काम करत आहेत. पैसे मिळतील अशा मोक्याच्या जागेवर चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते एपीएमसी मुख्यालयापर्यंत अनेकांचे अभय मिळत आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची फाईल जवळपास २० दिवस सचिवांच्या कार्यालयात पडून असून बदल्यांसाठी घोडाबाजार सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नवी मुंबईमध्ये सिडको व महापालिकेनंतर सर्वात महत्त्वाची आस्थापना म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ओळखली जाते. येथील विविध बाजारपेठांमध्ये वर्षाला २० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. एपीएमसीचे उत्पन्नही वर्षाला १०० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. प्रचंड आर्थिक व्यवहारांमुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पगाराव्यतिरिक्त वरकमाई करण्याची स्पर्धाच कामगारांमध्ये लागली आहे. यामधूनच प्रत्येक वर्षी बदल्यांचा हंगाम सुरू झाला की घोडेबाजार तेजीत येतो. आवक गेट, चेक नाके, ठाणे मार्केट, तेल मार्केट, मसाला व धान्य मार्केटमध्ये वर्णी लावून घेण्यासाठी गावच्या आमदारापासून ते थेट मंत्रालयापर्यंत अनेकांचा वशिला वापरण्यात येतो. कर्मचारी संघटनाही आपल्या सदस्यांना मोक्याची जागा मिळावी यासाठी प्रयत्न करतात. अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षे मोक्याच्या व वरकमाईच्या विभागातच काम करत आहेत. गेटवरील सुरक्षा रक्षकही आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांकडून ५ ते १० रुपये घेत असल्याचे चित्र दिसत आहे. गेट, चेक नाका सर्व कमाईचे अड्डे झाले आहेत. मसाला व धान्य मार्केटमध्ये कर्मचाऱ्याची बदली झाली की तेथून पुन्हा बदलीच होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. मागील महिन्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या काही कामगारांची बदली झाली. परंतु जे ६ ते ७ वर्षांपासून एकाच विभागात काम करत आहेत ते मात्र मसाला मार्केटमध्ये अद्याप चिकटून आहेत. धान्य व इतर मार्केटमध्येही तीच स्थिती आहे.
बाजार समितीमधील काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महिन्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील बदल्या पूर्ण झाल्या. दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांची यादी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तयार झाली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची बदली करण्यासाठीचा प्रस्ताव सचिव शिवाजी पहिनकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप बदल्यांच्या फाईलवर सह्णा करण्यात आलेल्या नाहीत. बदल्या रखडल्यामुळे मार्केटमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बदल्यांसाठी पैशांची बोली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. बदल्यांना जेवढा कालावधी लागणार तेवढ्या या अफवा वाढत जाणार आहेत.

नि:पक्ष बदल्या करण्याचे आश्वासन
च्एपीएमसीमध्ये प्रशासकीय मंडळ आल्यापासून कामकाजात पारदर्शकता आली आहे. अध्यक्ष मनोज सौनिक, सचिव शिवाजी पहिनकर यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गेट, फळ मधील विस्तारित मार्केटचे काम सुरू आहे.
च्व्यापाऱ्यांशीही चांगला संवाद ठेवला आहे. बदल्याही नि:पक्ष होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिनकर यांच्याशी संपर्क साधला असता तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांच्या बदल्या लवकरच करण्यात येणार असून मंगळवारपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बदल्यांच्या यादीवर लक्ष : एपीएमसीमधील बदल्यांची यादी तयार झाली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांची नावे त्यात आहेत. याची प्रत काही जणांनी मिळविली आहे.

Web Title: APMC transfer 'market'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.