एपीएमसीत सुरक्षारक्षकांना गुलामाची वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:48 AM2018-07-31T03:48:02+5:302018-07-31T03:48:11+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांना गुलामाप्रमाणे वागविले जात आहे. एक वरिष्ठ अधिकाऱ्याला घरातून ये - जा करण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. घरी भाजीपाला पुरविण्याबरोबर वर्तमानपत्रांचा भुर्दंडही सहन करावा लागत असून, एवढे लाड पुरवूनही गैरहजेरी लावून कर्मचाºयांचे नुकसानही केले जात आहे.
बाजार समितीमध्ये कोणत्याही समस्येला सुरक्षारक्षक मंडळाच्या कर्मचाºयांना जबाबदार धरण्याची पद्धत रूढ झाली आहे. चोरी झाली, अनधिकृत बांधकाम, अनागोंदी कारभार या सर्वांचे खापर सुरक्षारक्षकांवर फोडले जाते. सुरक्षारक्षक अधिकारी व कर्मचाºयांना वारंवार बोर्डात परत पाठविण्याची धमकी दिली जाते. यामुळे अन्याय होवूनही अनेक जण आवाज उठवत नाहीत. एप्रिल महिन्याचे वेतन दोन महिने उशिरा देण्यात आले. सद्यस्थितीमध्ये एक अधिकारी कर्मचाºयांना गुलामाप्रमाणे वागवत असल्याचे समोर येवू लागले आहे. या अधिकाºयाच्या घरी आठवड्यातून दोन वेळा भाजीपाला पोहच करावा लागतो. भाजीपाला मार्केटमध्ये न देता थेट घरीच नेवून देण्याची अट घालण्यात आली आहे. अधिकाºयाला घरापासून एपीएमसी व पुन्हा घरापर्यंत घेवून जाण्यासाठी रिक्षाची सोय करावी लागत आहे. या विरोधात कर्मचाºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून तक्रार करायची तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अडवणूक थांबावी : सुरक्षा अधिकारी बायोमेट्रिक मशिनवर एकवेळ थम्ब नसल्यामुळे पूर्णवेळ गैरहजेरी लावत आहेत. वास्तविक मे महिन्यापासून या अधिकाºयाची बायोमेट्रिक हजेरी तपासल्यास त्यामध्ये अनियमितता आढळून येईल. प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सतीश सोनी यांनी सुरक्षारक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे.