नवी मुंबई : नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्स या व्हॅलेंटाईन डे ला साजरा करीत आहे, 'प्रेमाची अद्वितीय भेट' आणि 'आपल्या प्रियजनांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या शरीराचा भाग दान करण्यापेक्षा कोणती मोठी भेटवस्तू असू शकते' अशी परंपरा निर्माण करण्यासाठी अवयव दाता आणि प्राप्तकर्त्यांमध्ये प्रेम, काळजी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अवयवदान जनजागृती करण्यासाठी १३ अवयवदाते जोडपी एकत्रित आली सोबतच अपोलो हॉस्पिटल्स डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी नवी मुंबईत अवयवदाते आणि प्राप्तकर्त्यांन सोबत साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’
संतोष मराठे, पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक-सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या प्रसंगी म्हणाले की, "व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे! आपल्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा भाग दान करणे ही प्रेमाची परिसीमा आहे. अवयवदाते आणि प्राप्तकर्त्यांना एकत्र आणून, आम्ही केवळ त्यांच्या निःस्वार्थ कृत्यांचा उत्सवच साजरा करत नाही तर अवयवदानाच्या प्रभावाविषयी जनजागृती करत आहोत आणि इतरांना सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देत आहोत. हे दाते इतरांसाठी एक चांगले उदाहरण निर्माण करत आहेत आणि अधिकाधिक लोकांना प्रेम आणि काळजी व्यक्त करण्यासाठी अवयव दान करण्यास आणि जगात सकारात्मकता निर्माण करण्यास प्रोत्साहित करत आहेत."