मुक्त चिन्ह आरक्षित करण्याचे आवाहन
By Admin | Published: January 24, 2017 05:57 AM2017-01-24T05:57:21+5:302017-01-24T05:57:21+5:30
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी नोंदणीकृत राजकीय पक्ष पुरस्कृत उमेदवारांना
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी नोंदणीकृत राजकीय पक्ष पुरस्कृत उमेदवारांना मुक्त चिन्हा पैकी एक चिन्ह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकाकरीता आरिक्षत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर एका नोंदणीकृत राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेला उमेदवार मागील लगतच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागेवर किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एक पेक्षा कमी येत असतील तर किमान एका जागेवर निवडून आले असतील तरी त्या राजकीय पक्षाने सक्षम प्राधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करु न, मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांकरीता त्यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांसाठी आरिक्षत करण्यासाठी अर्ज करता येईल. अटीच्या अधीन राहून सक्षम प्राधिकारी मागणी केलेले मुक्त चिन्ह त्या नोंदणीकृत पक्षासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकीसाठी तात्पुरते आरिक्षत मुक्त चिन्ह घोषित करेल. संबंधित राजकीय पक्षाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक राहील. जर एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांनी विहीत मुदतीत सक्षम प्राधिकाऱ्याकडे एकच मुक्त चिन्ह तात्पुरते आरक्षित करण्यासाठी अर्ज केल्यास व एकापेक्षा जास्त नोंदणीकृत राजकीय पक्ष उक्त आदेशाच्या तरतुदीप्रमाणे पात्र आढळल्यास जिल्हाधिकारी ज्या पक्षाचा अर्ज प्रथम प्राप्त झाला त्या पक्षास मागणी केलेले मुक्त चिन्ह वितरीत करेल. इतर नोंदणीकृत राजकीय पक्षांना राहिलेल्या इतर मुक्त चिन्हामधून अन्य मुक्त चिन्ह मागणी करणेबाबत संधी देण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)