शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केंद्र सरकारची नोकरी, 'डाक सेवक' पदासाठी 5 जूनपर्यंत अर्ज करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 6:18 PM

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील

मुंबई - भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 5 जून 2022 पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांनी केले आहे.

https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघर, पनवेल-410206 येथे जमा करता येईल.

टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईjobनोकरीPost Officeपोस्ट ऑफिस