नवी मुंबई : मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांसोबत ओळख वाढवून लैंगिक अत्याचार करणाºया एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने २५ पेक्षा अधिक महिला व मुलींचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाकरिता वरिष्ठ महिला अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोºहे यांनी केली आहे.
ऐरोली परिसरातील एका महिलेच्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने पंचवीसपेक्षा अधिक महिला व मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आली आहे. सचिन हा विवाहित व उच्चशिक्षित असून वासनेच्या भावनेतून मॅट्रिमोनियल साइटवर स्वत:ची नोंदणी करायचा. या वेळी एखाद्या मुलीची अथवा घटस्फोटित महिलेच्या प्रोफाईलची माहिती मिळवून तिच्यासोबत ओळख वाढवायचा. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून भेटीच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार करायचा. त्याने इतरही अनेक मुलींसोबत असे प्रकार केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी नेमण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोºहे यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्यासोबतदेखील फोनवरून चर्चा केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील लेखी निवेदन दिले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने डॉ. नीलम गोºहे यांनी चिंता व्यक्त केली आहे.तपास गोपनीय राहीलहा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखेकडे तपास सोपवावा. तपासाकरिता स्वतंत्र महिला अधिकाºयाची नियुक्ती करून त्यांचा संपर्क नंबर जाहीर केल्यास, पीडित महिलांना संरक्षितरीत्या आपल्यावरील झालेला अत्याचार मांडता येईल व तपासातदेखील गोपनीयता राहील, असा विश्वास डॉ. नीलम गोºहे यांनी व्यक्त केला आहे.