मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांची बदली करण्यात आली आहे. बंदराचा अध्यक्षपदाचा भार विद्यमान उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.त्यांनी मंगळवारी पदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांचा बंदराच्या विकास सिंहाचा वाटा आहे. धोरणात्मक निर्णय बंदराचे कामकाज, पायाभूत सुविधा आणि एकूण कार्यक्षमतेवर त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. सागरी क्षेत्रातील एक प्रमुख नेतृत्व म्हणूनही त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
जेएनपीएच्या अध्यक्ष पदाचा धुरा विद्यमान उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वाघ यांच्याकडे असणारा सागरी उद्योगातील दांडगा अनुभव आणि प्रभावी कार्यपद्धती यांच्या बळावर त्यांचेही बंदराच्या विकासात मोलाचे योगदान आहे. सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्कातील दोन दशकांहून अधिक अनुभव असलेले उन्मेष वाघ यांनी यापूर्वी कोलकाता येथे सीमाशुल्क आयुक्त (बंदर) म्हणून काम केले आहे.