नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

By वैभव गायकर | Published: March 10, 2024 07:30 PM2024-03-10T19:30:04+5:302024-03-10T19:30:23+5:30

Navi Mumbai News: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल याठिकाणी उभारण्यात आलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.10 रोजी पनवेल याठिकाणी व्यक्त केला.

Appreciation from Devendra Fadnavis, Marhadharshak for the Navi Mumbai Evidence Management Cell country | नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

नवी मुंबई पुरावा व्यवस्थापन कक्ष देशासाठी मर्हादर्शक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

- वैभव गायकर 
पनवेल - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल याठिकाणी उभारण्यात आलेले पुरावा व्यवस्थापन कक्ष हा महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.10 रोजी पनवेल याठिकाणी व्यक्त केला. मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले त्यावेळी ती बोलत होते.

यावेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचेदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उ‌द्घाटन झाल्याचे त्यांनी सांगितले . या कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर ,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे,अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे,परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते .मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांकडून या कक्षाचे कामकाज, केस पेपर रूम, रेकॉर्ड कक्षाची पाहणी केली.तसेच ई-पैरवी कक्षाचे कामकाज, सायबर सेलच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली .कार्यक्रमस्थळी विविध प्रकल्पांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.यामध्ये डायल 112 , आय बाईक,यथार्थ, नेल्सन सिस्टीम, जागरूक नवी मंबईकर, सायबर एफआययु, वुमन हेल्प डेस्क, ट्राफीक हेल्प डेस्क स्टॉल्सचा समावेश होता.

Web Title: Appreciation from Devendra Fadnavis, Marhadharshak for the Navi Mumbai Evidence Management Cell country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.