शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

रुग्णालयात उद्वाहन बसवण्यास मंजुरी, पालिका रुग्णालयात रुग्णांची गैरसोय टळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 3:44 AM

पालिकेच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातील जुन्या उद्वाहन (लिफ्ट) बदलण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : पालिकेच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातील जुन्या उद्वाहन (लिफ्ट) बदलण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.वाशीतील पालिका रुग्णालयातील सध्याच्या लिफ्ट (उद्वाहन) बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी या लिफ्ट बसवलेल्या असल्याने वारंवार त्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. यानंतरही त्या बंद पडत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. तसेच रुग्णांच्या भेटीसाठी आलेले आरोग्य समिती सभापतींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती यापूर्वी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकल्याही आहेत. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाची एका मजल्यावरून दुसºया मजल्यावर ने-आण करताना लिफ्ट बंद पडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झालेली होती. याची दखल घेत पालिका प्रशासनाने रुग्णालयात चार नव्या लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. चारही लिफ्ट २० व्यक्तींच्या क्षमतेच्या व स्ट्रेचर नेता येतील, अशा आकाराच्या असणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी आला होता. या वेळी नगरसेविका सरोज पाटील, नगरसेवक मनोहर मढवी, नामदेव भगत यांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासनाला काही सूचना व बदलही सुचवले. यानुसार चर्चेअंती महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. महासभेच्या मंजुरीनंतर लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या चारही लिफ्टकरिता प्रशासनाने अंदाजे १ कोटी ११ लाख ५६ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. त्याकरिता तीन नामांकित कंपन्यांकडून दरपत्रक मागवण्यात आले आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या नव्या लिफ्ट रुग्णालयात बसवल्या जाणार आहेत. त्यानंतर लिफ्टअभावी रुग्णालयातील रुग्णांची व नातेवाइकांची एका मजल्यावरून दुसºया मजल्यावर होणारी गैरसोय टळणार आहे.