शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘नैना’च्या आराखड्याला फेब्रुवारीत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2016 2:23 AM

शासनाकडे पाठवलेल्या नैना प्रकल्पाच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी व्यक्त केला

नवी मुंबई : शासनाकडे पाठवलेल्या नैना प्रकल्पाच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे. तसेच खालापूरची अधिक ११ गावे नैना प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या वतीने वाशीत भरवलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या वतीने वाशीत सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १६ वे मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १५० हून अधिक विकासकांनी सहभाग घेतला आहे. त्याशिवाय विविध बँका व वित्त संस्थांनीदेखील त्या ठिकाणी स्टॉल मांडून गृहकर्जाचे विविध पर्याय नागरिकांसाठी खुले केले आहेत. या प्रदर्शनाचे उदटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सिडको उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, आमदार मंदा म्हात्रे, बीएएनएमचे अध्यक्ष धर्मेंद्र कारिया, हेमंत लखानी, हरेश छेडा, रसिक चौहान, देवांग त्रिवेदी आदी विकासक उपस्थित होते. यावेळी सिडकोने शासनाकडे पाठवलेल्या नैना क्षेत्राच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास भाटीया यांनी व्यक्त केला. तर खालापूरची अधिक ११ गावेदेखील नैना क्षेत्रात सहभागी होण्यासाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय वांद्रा-कुर्लाच्या धर्तीवर खारघर येथे सेंट्रल पार्कलगत इंटरनॅशनल फायनान्स सेंटर उभारणे विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रदर्शनात अधिकाधिक विकासकांनी साऊथ नवी मुंबईतले प्रस्तावित गृहप्रकल्प नागरिकांच्या पसंतीसाठी मांडले आहेत. नैना क्षेत्रामुळे घरांची मागणी वाढणार आहे. यामुळे पनवेल ते खोपोलीदरम्यान घर खरेदीची मोठी संधी प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष धर्मेंद्र कारिया यांनी सांगितले. चार दिवसीय प्रदर्शनाला किमान १ लाख नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. घर बुकींगद्वारे सुमारे २ हजार कोटींचा व्यवहार होईल, असा विश्वाही कारिया यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)