शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सिडकोच्या नैना प्रकल्पातील तिसऱ्या टीपी योजनेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:36 AM

पहिल्या टप्प्याच्या विकासाला गती : चिपळे, काप्रोली, नेरे, विहिघर, मोहो गावांतील ४३४ हेक्टर क्षेत्रफळाचा समावेश

नवी मुंबई : नैनाच्या पहिल्या टप्यातील २३ गावांच्या विकास आराखड्याला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. टीपी स्कीम अर्थात नगररचना परियोजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्यात चिपळे, कोप्रोली, नेरे, विहीघर व मोहो या गावातील ४३४ हेक्टर क्षेत्राचा समावेश असलेल्या तिसºया टीपी स्कीमला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे.

नैनाच्या तिसºया टिपी स्कीमला मंजुरी मिळाल्याने आता राज्य सरकार मध्यस्थाची (आर्बिटरेटर) नियुक्ती करणार आहे. त्यांच्या माध्यमातून जमिनीधारकांकडून घ्यावयाची जमीन, त्याबदल्यात संबधित भूधारकांना देय असलेल्या भूखंडांचे सिमांकन करणे तसेच अधिनियमात ठरविलेल्या अन्य मुद्यांचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नैना क्षेत्राच्या विकासाकरीता आतापर्यंत मंजूर झालेल्या पहिल्या तीन नगरचना परियोजनांमुळे एकूण ६४८ हेक्टर क्षेत्राचा नियोजित विकास आराखडा तयार झाला आहे. या तीन नगररचना योजनेंतर्गत २५0 हेक्टर क्षेत्रफळावर एकूण ८३0 अंतिम भूखंड जमीन मालकांना विकासासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. याशिवाय शाळांसाठी १७ भूखंड राखीव असून ७७ हेक्टर जमीनीवर उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित केली जाणार आहेत. ५२ किमी लांबीच्या रस्त्यांचे प्रस्तावित असून २६ हेक्टर जमीन ही सामाजिक सुविधांसाठी आणि ३५ हेक्टर जमीन ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहनिर्मित्तीसाठी राखीव आहे. याशिवाय क्रीडांगण, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाण्यासाठी ६ हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे.

एप्रिल २0१४ मध्ये नैना क्षेत्रातील २३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्याचा विकास आराखडा मंजूर झाला. तेव्हापासून केवळ ६४८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन पूर्ण झाले आहे. यापूर्वीच घोषित केलेल्या आणखी चार नगररचना परियोजनाशासन स्तरावर मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.तिसरी मुंबई दृष्टिपथात ...१0 जानेवारी २0१३ रोजी अधिसूचित झालेल्या नैना क्षेत्रात ४७४ चौ. कि.मी. परिसराचा समावेश आहे. नागरी विकासाचे नैना मॉडेल तयार करताना या क्षेत्रात तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने नियोजन सुरू केले आहे. मुंबई, नवी मुंबईलगतच नैना क्षेत्र असल्याने भविष्यात २0 लाखांहून अधिक घरांची निर्मिती या क्षेत्रात केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी, रिलायन्स एसईझेड, सिडको विकसीत क्षेत्र आदी नैना क्षेत्राला लागूनच असल्याने या परिसराच्या विकासला गती मिळणार आहे.वीस वर्षांत विकासाचे उद्दिष्ट्यनैना क्षेत्राचा पहिला टप्पा पुढील सात वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे, तर दुसºया टप्यातील पायाभूत सुविधांवर सिडकोने १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. ही रक्कम नैना योजनेअंतर्गत भूधारकांकडून सिडकोला प्राप्त होणाºया ४0 टक्के भूखंडांपैकी १५ टक्के भूखंडांच्या विक्रीतून उभारली जाणार आहे.सात हजार कोटींचा खर्चनैना क्षेत्रात रस्त्यांचे जाळे उभारतानाच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिडको ७ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. सडकोच्या या प्रकल्पाला प्रत्यक्ष साकारण्याकामी नगरविकास, महाराष्ट्र शासन, राज्य नगर व देश नियोजन विभाग, पुणे यांचे भरपूर सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई