पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 01:42 PM2021-10-30T13:42:24+5:302021-10-30T13:42:55+5:30

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.३ चे अं.भु.क्र.१२७ अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, या कामाच्या सकारात्मक भिन्नता व नकारात्मक भिन्नता व अतिरिक्त बाबला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली.

Approval of various issues in the meeting of Panvel Municipal Corporation Standing Committee | पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

पनवेल महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी 

Next

पनेवल : पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची  सभा शुक्रवारी मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शाळा क्रमांक ३ चे नव्याने बांधकाम,जम्बो कोविड केअर सेंटरला वाहनांचा पुरवठा करण्यासह पनवेल शहर येथील जलशुद्धीकरण केंद्र, उच्चस्तरीय जलकुंभ तसेच देहरंग धरण व वितरण नेटवर्क परिचालनासाठी मनुष्यबळ पुरविणे  अतिरिक्त बाबींच्या खर्चास मंजुरी आली.
पनवेल महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.३ चे अं.भु.क्र.१२७ अ मध्ये नवीन शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे, या कामाच्या सकारात्मक भिन्नता व नकारात्मक भिन्नता व अतिरिक्त बाबला मान्यता मिळण्याबाबतच्या विषयाला मान्यता देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकरिता कोविड-१९ कामी महापालिकेचे मंजूर ठेकेदार जे. के. टुरिस्ट ॲण्ड ट्रान्सपोर्ट यांच्यामार्फत वाहने भाडेतत्त्वावर घेणेकामी करण्यात आलेला खर्चास मान्यता मिळणेबाबतच्या विषय स्थगित करण्यात आला.
 अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागासाठी अनधिकृत बांधकामे,अतिक्रमणे, धोकादायक बांधकामे निष्कासित करण्याच्या कामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्री व वाहने पुरविण्याकरिता जाहीर ई निविदेच्या माध्यमातून फेर ऑनलाईन ई निविदेस मंजुरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या मुदतपूर्ती झालेल्या मुदत ठेवींची नव्याने राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. पनवेल मनपा हद्दीतील शौचालयांची साफसफाई करण्याबाबतच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.
सन २०२१-२०२२ व सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरिता व सन २०२३-२०२४  च्या निविदा मंजूर होईपर्यंतच्या कालावधीकरिता पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी, उद्यान  सार्व. बागेत व महापालिका सूचित करेल त्या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबिन ), आसनव्यवस्था कामी बाकडे, उद्यानातील खेळणी व उद्यानात व्यायामाचे साहित्य इ. चा पुरवठा करुन बसविणे करिता निविदा पत्रकात नमूद केलेले साहित्य पुरविणे कामी  प्राप्त निविदा धारकांच्या दरास विषयास मंजुरी देण्यात आली.

Web Title: Approval of various issues in the meeting of Panvel Municipal Corporation Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल