पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत, ३५ जागांवर महिला सरपंच बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:32 AM2021-01-22T08:32:18+5:302021-01-22T08:34:00+5:30

पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत.

arakshan sodat for Sarpanch post of 71 Gram Panchayats in Panvel | पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत, ३५ जागांवर महिला सरपंच बसणार

पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत, ३५ जागांवर महिला सरपंच बसणार

googlenewsNext


पनवेल : तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या २४ ग्रामपंचायतींसह एकूण ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी फडके नाट्यगृहात पार पडली. या सोडतीसाठी नव्याने निवडून आलेल्या २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या सोडतीबाबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. तर, मनासारखे आरक्षण न मिळाल्याने अनेकजण नाराज असल्याचेही दिसले.

पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. हे आरक्षण जाहीर करताना २०११च्या जनगणनेचा विचार करण्यात आला. मागील १५ वर्षात पाली देवद ग्रामपंचायतीवर ओबीसी महिला सरपंच  नसल्याने माजी पंचायत समिती सभापती राजेश केणी यांनी सोडतीदरम्यान आक्षेप घेतला. येथील आरक्षणाची सोडत चिठ्ठीद्वारे होणार होती. केणी यांच्या आक्षेपाची प्रांत अधिकारी नवले यांनी दखल घेत पाली देवद ग्रामपंचायतीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आले.

या सोडतीदरम्यान महिला आरक्षण पडलेल्या जागांवर अनेकांनी आक्षेप घेत आरक्षण बदलण्याची विनंती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याकडे केल्याचे दिसले. मात्र संबंधित आरक्षण कायद्याच्या निकषानुसारच असल्याचे यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर आक्षेप घेणाऱ्यांचे समाधान झाले. 

लॉबिंग सुरू -
सरपंच पदासाठी अनेकांचे लॉबिंग सुरू होणार आहे. विशेषतः १९ ग्रामपंचायतींवर पडलेल्या सर्वसाधारण जागांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक पुढे येण्याची शक्यता आहे.

असे असेल आरक्षण - 
- अनुसूचित जाती - बारवई,
- अनुसूचित जमाती- पोयंजे, मोरबे, वाकडी, सांगुर्ली, वारदोली, हरिग्राम,
- नागरिकांचा मागास प्रवर्ग- गिरवले, कसळखड, चिखले, विचुंबे, देवद, कराडे खुर्द, नांदगाव, चिपळे, पाले-बु., केळवणे,
- सर्वसाधारण- ओवळे, दुंदरे, न्हावे, मलडुंगी, जांभिवली, शिरवली, आदई, पारगाव, गव्हाण, वडघर, सावळे, खेरणे खु., शिवकर, करंजाडे, वाघिवली, चिंद्रण, 
नेरे, कानपोली, भातण,
- अनुसूचित जाती महिला -तरघर,
- अनुसूचित जमाती महिला- भिंगार, उसर्ली, तुराडे, चावणे, उलवा, खानावळे
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -गुळसुंदे, वावेघर, कर्नाळा, पोसरी, पाली देवद, वलप, केवाळे, उमरोली, शिरढोण,
- सर्वसाधारण महिला - कोन, सोमाटणे, दापोली, कुंडेवहाळ, वावंजे, वांगणीतर्फे वाजे, वहाळ, पळस्पे, नानोशी, कोळखे, साई, वाजे, आकुर्ली, खैरवाडी, खानाव, आपटा, देवळोली बु., नितळस, दिघाटी.

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम शासनामार्फत जाहीर झाल्यावर याठिकाणी निवडणुका घेतल्या जातील.
- दत्तात्रेय नवले, प्रांत अधिकारी, पनवेल 

Web Title: arakshan sodat for Sarpanch post of 71 Gram Panchayats in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.