गौण खनिज उत्खननाला चाप

By admin | Published: November 26, 2015 02:06 AM2015-11-26T02:06:09+5:302015-11-26T02:06:09+5:30

तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकाने चाप लावला आहे. गेल्या तीन महिन्यांत शंभरपेक्षा जास्त प्रकरणे या पथकाने बाहेर काढली आहेत

Arc mineral excavation | गौण खनिज उत्खननाला चाप

गौण खनिज उत्खननाला चाप

Next

पनवेल : तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकाने चाप लावला आहे. गेल्या तीन महिन्यांत शंभरपेक्षा जास्त प्रकरणे या पथकाने बाहेर काढली आहेत. त्याच्याबरोबर त्यांच्याकडून पावणे तीन कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आणि आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
पनवेल मुंबईपासून अगदी जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तालुका आहे. सिडकोमुळे या भागाचा झपाट्याने विकास झाला, त्याचबरोबर प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराचा चेहरामोहराच बदलत आहे. नागरीकरणाचे लोन ग्रामीण भागात पसरले असून टोलजंग इमारती ठिकठिकाणी उभ्या राहत आहेत.
बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेती, दगड आणि खडीची मागणी असल्याने या भागातील दगडखाणी त्याचबरोबर खडी क्र शर गेल्या काही वर्षात अतिशय तेजीत आहेत. त्याचबरोबर रेतीची मागणी पूर्ण करण्याकरिता वाघिवली, गणेशपुरी, उलवे, ओवळा, पारगाव, बेलपाडा या भागातील खाडीप्रवण क्षेत्रातून रेती उपसा होत होता. गेल्या काही वर्षात रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात खाडी पोखरून रेतीचा उपसा केला आहे. मात्र याविरोधात जिल्हाधिकारी शीतल उगले- तेली यांच्या आदेशानुसार तहसीलदार दीपक आकडे आणि गौण खनिज पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार बी.टी. गोसावी यांनी गेल्या महिन्यापासून मोहीमच उघडली आहे. त्यांनी काही दिवसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत धाडी टाकून रेती माफियांना सळो की पळो करून सोडले आहे. शेकडो ब्रास रेती जप्त केलीच त्याचबरोबर वाहतूक करणारे वाहने, सक्शन पंप, बार्ज हस्तगत केले. त्याचबरोबर खारघर, कामोठे, एनआरआय, नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. एकंदरीत गेल्या एक -दोन महिन्यापासून रेती उपासा जवळपास बंद करण्यास या पथकाला यश आले आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प, कारखाने, बांधकामासाठी उत्खनन केले जाते त्यांच्यावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. (वार्ताहर)
पनवेल तहसील कार्यालयाने बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणावर धाडसत्र सुरुच ठेवले असून मंगळवारी पारगाव दापोली रस्त्यालगत खाडीजवळ बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करीत सुमारे ५६५ ब्रास वाळू जप्त केली. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, नायब तहसीलदार बी.टी.गोसावी यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली आहे. या वाळूमध्ये २१० ब्रास वाळू , १४५ ब्रास रेजनमिश्रित वाळू, २१० मातीमिश्रित वाळू अशी सुमारे ५६५ ब्रास वाळू जप्त केली. या वाळूची किं मत सुमारे १२ लाख रुपये होत असल्याची माहिती नायब तहसीलदार बी. टी.गोसावी यांनी दिली. या कारवाईत तब्बल १७ सक्शन पंप देखील जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात सक्शन पंप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Arc mineral excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.