अभिलाषा म्हात्रे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

By Admin | Published: August 16, 2015 11:51 PM2015-08-16T23:51:34+5:302015-08-16T23:51:34+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे

Arjuna Award for Arjuna award | अभिलाषा म्हात्रे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

अभिलाषा म्हात्रे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २९ आॅगस्टला नवी दिल्लीत क्रीडादिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे. अभिलाषा म्हात्रे यांनी २०१२च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच २०१४च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम
कामगिरी करीत देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने ११ आॅगस्ट रोजी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. कबड्डी क्रीडा प्रकारामध्ये अभिलाषा यांची निवड जाहीर झाली आहे. नागरी सेवा सुविधांच्या दर्जेदार पूर्ततेमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांनी गौरव होत असतानाच अभिलाषा म्हात्रे यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे क्रीडा क्षेत्रातही नवी मुंबईची मान अभिमानाने उंचावली आहे, अशा शब्दांत महापौर
सुधाकर सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे यांच्यासह सर्व महापालिका पदाधिकारी, नगरसेवक - नगरसेविका, अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यावतीनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arjuna Award for Arjuna award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.