शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

अभिलाषा म्हात्रे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

By admin | Published: August 16, 2015 11:51 PM

नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील मानाचा ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २९ आॅगस्टला नवी दिल्लीत क्रीडादिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अभिलाषा म्हात्रे यांनी २०१२च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच २०१४च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम कामगिरी करीत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने ११ आॅगस्ट रोजी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. कबड्डी क्रीडा प्रकारामध्ये अभिलाषा यांची निवड जाहीर झाली आहे. नागरी सेवा सुविधांच्या दर्जेदार पूर्ततेमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांनी गौरव होत असतानाच अभिलाषा म्हात्रे यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे क्रीडा क्षेत्रातही नवी मुंबईची मान अभिमानाने उंचावली आहे, अशा शब्दांत महापौर सुधाकर सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे यांच्यासह सर्व महापालिका पदाधिकारी, नगरसेवक - नगरसेविका, अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यावतीनही त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)