ऐरोलीत भारत महोत्सव सुरू
By admin | Published: January 14, 2017 07:04 AM2017-01-14T07:04:21+5:302017-01-14T07:04:21+5:30
ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले.
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ७ येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर आयोजित भारत महोत्सव २०१७ चे शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झाले. देशातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाला नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महोत्सवाचे लोकमत माध्यम प्रायोजक आहे.
आई एकविरा देवीच्या पालखीने या महोत्वासची सुरुवात झाली. याठिकाणी मातेचे मंदिर उभारले गेले असून तिथेच मूर्तीची स्थापना करण्यात आली. महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रांगोळी प्रदर्शन. महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे,ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, उपमहापौर अविनाश लाड, राबळे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, स्थानिक नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक नृत्याविष्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी याठिकाणी कलाविष्कार सादर केले. विविध जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन कार्यक्र माचा आस्वाद घेतला.
ढोल ताशा पथकाने याठिकाणी प्रात्यिक्षक सादर केली. गेट वे आॅफ इंडिया, चार मिनार, इंडिया गेट, ताज महाल यांच्या प्रतिकृती याठिकाणी मांडण्यात आल्या आहे. रविवारी, १५ जानेवारी रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)