नवी मुंबई : सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना देण्यात आलेला निळा रंगाचा गणवेश बदलून खाकी रंगाचा गणवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून करण्यात येत आहे; परंतु मंडळातील अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे गणवेशाचा रंग बदलण्यात आला नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या सानपाडा कार्यालयातील अधिकाºयांना गुरु वार, १० जानेवारी रोजी घेराव घालण्यात आला. सुरक्षारक्षकांना मंडळाकडून देण्यात येणाºया सुविधांकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप या वेळी मनसेच्या पदाधिकाºयांनी केला.
सुरक्षारक्षक मंडळात काम करणाºया सुरक्षारक्षकांना निळ्या रंगाचा गणवेश देण्यात आला आहे. गणवेशाचा रंग बदलून पोलिसांप्रमाणे खाकी रंगाचा पोशाख देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेनेने केली होती. या बाबत गेल्या वर्षी कामगारमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठकही झाली असल्याचे तळावडेकर यांनी सांगितले. त्या वेळी निळ्या रंगाच्या गणवेशाचा सुमारे ७० लाख रु पये किमतीचा कपडा शिल्लक असून, तो संपल्यावर त्यापुढे खाकी रंगाचा कपडा मागविण्यात येईल आणि गणवेशात बदल करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतानाही पुन्हा निळ्या रंगाचे कापड घेण्याची निविदा कशी काढण्यात आली, याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेनेने मंडळाच्या सानपाडा कार्यालयातील अधिकाºयांना धारेवर धरले, या वेळी मनसेच्या माध्यमातून मंडळाचे सचिव दिनेश पाटोळे यांना निवेदनही देण्यात आले. सदर निवेदन मंत्रालयात पोहोचविणार असून, या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे पाटोळे यांनी सांगितले. सुरक्षारक्षकांना देण्यात येणाºया इतर सुविधांकडेही मंडळाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षारक्षक सेनेचे उपाध्यक्ष शशिकांत कळसकर, देवेंद्र पाटील, सचिन बंडगर, संजय पाटील, अरविंद लिंबसकर, राजेंद्र संकपाळ, विनोद कुपटे, सुनील कवडे, गुरदिपसिंग डोगरा, संतोष शेटके, गणेश दाष्टे, सुरेश चिंचोळकर आदी सदस्य आणि सुरक्षारक्षक कर्मचारी उपस्थित होते.