पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना निवाऱ्याची व्यवस्था; पोलीस आयुक्तालयामार्फत सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:09 AM2018-03-22T03:09:29+5:302018-03-22T03:09:29+5:30
पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली याठिकाणी होत आहे. राज्यभरातील उमेदवार याठिकाणी पोलीस भरतीसाठी आले असताना या उमेदवारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली नव्हती.
पनवेल : पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या २८ हजार उमेदवारांपैकी १२०० उमेदवारांची रोज मैदानी चाचणी नवी मुंबई पोलीस मुख्यालय कळंबोली याठिकाणी होत आहे. राज्यभरातील उमेदवार याठिकाणी पोलीस भरतीसाठी आले असताना या उमेदवारांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली गेली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १८ मार्च रोजी बातमी प्रकाशित केल्यानंतर या उमेदवारांची रात्री झोपण्याची व्यवस्था पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांच्या दोन वेळच्या अल्पोपहारासाठी देखील सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत.
‘लोकमत’ने भावी पोलिसांची धडपड व पोलीस भरतीसंदर्भात उद्भवणाºया विविध अडथळ्यांची माहिती देणारे वृत्त प्रकाशित के ले होते. दिवसभर मैदानी चाचणी प्रक्रि या पार केलेल्या या उमेदवारांना उघड्यावरच रात्र काढावी लागली होती. राज्यभरातील कानाकोपºयातून व दुर्गम भागातील तरु णांना अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत असताना ‘लोकमत’ने या समस्येवर प्रकाश टाकला असता या तरु णांची रात्री झोपण्याची व्यवस्था मुख्यालयात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तरुणांच्या दोन वेळच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यासाठी खारघर वेल्फेअर असोसिएशन ही संस्था पुढे सरसावली आहे. कळंबोली मुख्यालयाजवळ सकाळी या उमेदवारांना रोज खिचडी ही संस्था पुरवीत आहे. सायंकाळी देखील खारघरमध्ये अल्पोपहाराची व्यवस्था या संस्थेचे अध्यक्ष मनोज शारबिंद्रे हे स्वखर्चाने करीत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १७५पदांसाठी ही भरती प्रक्रि या सुरू आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ही भरती सुरू असल्याने खारघर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज शारबिंद्रे यांनी पनवेल महानगर पालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना खारघर, कळंबोली परिसरात तात्पुरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत शारबिंद्रे यांनी व्यक्त केली. पोलीस भरतीची ही प्रक्रि या १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.