बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक , तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:49 AM2018-03-28T00:49:09+5:302018-03-28T00:49:09+5:30

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्या छापण्याचा प्रिंटर जप्त करण्यात आला आहे

Arrested by fake currency notes, arrested by TEDM MIDC Police | बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक , तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक , तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

Next

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्या छापण्याचा प्रिंटर जप्त करण्यात आला आहे. तुर्भे नाका परिसरात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तुर्भे नाका परिसरात काही जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झांजे, पोलीस नाईक सागर रसाळ, सोमनाथ वने, स्वप्निल अहिरे, शिपाई सूरज जाधव, युवराज राऊत यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. या वेळी संशयास्पदरीत्या वावरणाºया दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा तुर्भे नाका परिसरात वितरित करण्यासाठी ते आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विनोद गोस्वामी (३८) व महेश चौधरी (२७) अशी त्यांची नावे आहेत. गोस्वामी हा चांदिवलीचा तर चौधरी मालवणीचा राहणारा आहे. त्यांचा नवी मुंबई परिसरात छोट्या दुकानांना तेल पुरवठ्याचा व्यवसाय आहे.
भारतीय चलनाच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून ते व्यवहारात आणायचे. याकरिता त्यांनी रंगीत प्रिंटर खरेदी केला होता. साध्या पेपरवर नोटांची रंगीत झेरॉक्स काढून बनावट नोटा तयार करायचे. याप्रकारे त्यांनी तयार केलेल्या १०० रुपये दराच्या ११४, २०० रुपयांच्या २८ तर ५०० रुपयांच्या १० नोटा असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटा त्यांच्याकडे आढळून आल्या आहेत. नोटा छापण्यासाठी त्यांनी वापरलेला प्रिंटर, तसेच ३४ कोरे बाँड पेपर, चिकटपट्टी, फूटपट्टी असे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. ज्यांच्यासोबत तेलाचा व्यवहार करायचे, त्यांनाच खºया नोटांमध्ये बनावट नोटा मिसळून ते फसवणूक करायचे. ही बाब तुर्भेतील एका दुकानदाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही बनावट नोटांसह अटक केली. त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Arrested by fake currency notes, arrested by TEDM MIDC Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.