शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक , तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:49 AM

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्या छापण्याचा प्रिंटर जप्त करण्यात आला आहे

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटांसह त्या छापण्याचा प्रिंटर जप्त करण्यात आला आहे. तुर्भे नाका परिसरात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे.तुर्भे नाका परिसरात काही जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अमर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झांजे, पोलीस नाईक सागर रसाळ, सोमनाथ वने, स्वप्निल अहिरे, शिपाई सूरज जाधव, युवराज राऊत यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. या वेळी संशयास्पदरीत्या वावरणाºया दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा तुर्भे नाका परिसरात वितरित करण्यासाठी ते आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विनोद गोस्वामी (३८) व महेश चौधरी (२७) अशी त्यांची नावे आहेत. गोस्वामी हा चांदिवलीचा तर चौधरी मालवणीचा राहणारा आहे. त्यांचा नवी मुंबई परिसरात छोट्या दुकानांना तेल पुरवठ्याचा व्यवसाय आहे.भारतीय चलनाच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून ते व्यवहारात आणायचे. याकरिता त्यांनी रंगीत प्रिंटर खरेदी केला होता. साध्या पेपरवर नोटांची रंगीत झेरॉक्स काढून बनावट नोटा तयार करायचे. याप्रकारे त्यांनी तयार केलेल्या १०० रुपये दराच्या ११४, २०० रुपयांच्या २८ तर ५०० रुपयांच्या १० नोटा असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटा त्यांच्याकडे आढळून आल्या आहेत. नोटा छापण्यासाठी त्यांनी वापरलेला प्रिंटर, तसेच ३४ कोरे बाँड पेपर, चिकटपट्टी, फूटपट्टी असे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे. ज्यांच्यासोबत तेलाचा व्यवहार करायचे, त्यांनाच खºया नोटांमध्ये बनावट नोटा मिसळून ते फसवणूक करायचे. ही बाब तुर्भेतील एका दुकानदाराच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही बनावट नोटांसह अटक केली. त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.