खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक; वाशी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:39 PM2020-01-16T23:39:50+5:302020-01-16T23:40:08+5:30

तीन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

Arrested for smuggling cats; Vashi police action | खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक; वाशी पोलिसांची कारवाई

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक; वाशी पोलिसांची कारवाई

Next

नवी मुंबई : वाशी येथे अवैधरीत्या दुर्मीळ खवल्या मांजराची तस्करी करणाºया तीन आरोपींना बुधवार, १५ जानेवारी रोजी मध्यरात्री वाशी सेक्टर १७ येथून वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वाशी सेक्टर १७ येथील सिटी बँकेसमोर पाम बीच मार्गाने एका ग्रे रंगाच्या मारु ती इको कारमधून तीन इसम दुर्मीळ प्रजातीच्या खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याची वरिष्ठांना माहिती देऊन त्या अनुषंगाने वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस, दोन पंच, ठाणे वनविभागाचे वनपाल मनोज परदेशी, ठाणे येथील महाराष्ट्र शासनाचे वाइल्ड लाइफ वार्डन पवन शर्मा यांच्या माध्यमातून पोलीस सापळा लावण्यात आला होता. पहाटे इको कारचालक कृष्णा पद्माकर चौगुले, वय ३० वर्षे, राहणार रोहा, नाना लक्ष्मण वाघमारे, वय ३९ वर्षे, राहणार रोहा आणि मंगेश यशवंत वाघमारे, वय २५ वर्षे, राहणार रोहा यांना ताब्यात घेतले. गाडीमध्ये असलेली पांढºया रंगाची गोणदेखील ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये एक तपकिरी रंगाचे खवले मांजर आढळले. यानंतर संबंधितांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरु वारी आरोपींना सीबीडी न्यायालयात हजार केले असता १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

सदरची कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार, सहायक आयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वाशी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खांद्रे, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ माने आदी पोलीस कर्मचारी यांनी केली.

गाडीमध्ये असलेली पांढºया रंगाची गोणदेखील ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये एक तपकिरी रंगाचे खवले मांजर आढळले. वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, गुरु वारी सीबीडी न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Arrested for smuggling cats; Vashi police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस