शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडवणाऱ्यांना अटक 

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 27, 2024 8:17 PM

सायबर पोलिसांची कारवाई : ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांचा उलगडा  

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शेअर मार्केटच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन टोळ्यांचा उलगडा सायबर पोलिसांनी केला आहे. याप्रकणारी तिघांना अटक केली असून त्यांनी वापरलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत. कामोठे व मुंबई परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींच्या सायबर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई सायबर पोलिसांनी असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये वापरण्यात आलेली बँक खाती, मोबाईल नंबर याद्वारे सायबर पोलिसांकडून अधिक तपास सुरु होता. त्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी उपनिरीक्षक लिंगराम देवकत्ते, रोहित बंडगर, एकनाथ बुरुंगले, नरहरी क्षीरसागर, विजय आयरे, संदेश गुजर आदींचे पथक केले होते. त्यांनी दोन्ही गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास चालवला होता. त्यामध्ये एका पथकाला कामोठे मधील निलेश इंगवले (३०) याची माहिती मिळाली होती. याद्वारे त्याचा शोध घेतला असता त्याने संजय पाटील (४८) याची माहिती उघड केली. त्यानुसार परिसरात दूध व्यवसाय करणाऱ्या संजयलाही अटक करण्यात आली. 

संजय व त्याचे इतर साथीदारांनी वसई व इतर परिसरातील नागरिकांच्या कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडून ते गुन्ह्यासाठी वापर होते. त्यानुसार संजयकडून ५ चेकबुक, ६ डेबिट कार्ड, ४ मोबाईल फोन व १० सिमकार्ड जप्त केले आहेत. शिवाय त्याने वापरलेली बँक खाती गोठवली असून त्यात १८ लाख ५१ हजार मिळून आले आहेत. या टोळीचा दहा गुन्ह्यातील समावेश समोर आला आहे. 

दुसऱ्या पथकाने मीरारोड परिसरातून पियुष लोढा (३९) याला अटक केली असून त्याच्याकडे ७ मोबाईल, १५ सिमकार्ड, ९ एटीएम कार्ड, २ चेकबुक, २ पॅनकार्ड, ४ रबर स्टॅम्प मिळून आले आहेत. पियुष हा केवळ खाते सांभाळणारा असून गुन्ह्यांचे मुख्य सूत्रधारांचे रॅकेट मोठे असून पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या टोळीचा देशभरात ३२ गुन्ह्यात सहभाग समोर आला आहे. त्यांनी वापरलेली बँक खाती पोलिसांनी गोठवली असून त्यामध्ये १६ लाख ७१ हजार रुपये मिळून आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई