प्रवाशांना लुटणाऱ्यांना केले अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:48 AM2018-04-24T00:48:19+5:302018-04-24T00:48:19+5:30
या प्रकरणात अटक करण्यात आलेला सूरज पाटील हा खारघर सेक्टर-१३ मध्ये, तर त्याचा सहकारी सचिन पवार हा खालापूर येथे राहाण्यास आहे.
पनवेल : दिवसा रिक्षा चालवून रात्रीच्या सुमारास संधी साधून प्रवाशांच्या अंगावरील दागिने लुटणाºया दोघा रिक्षाचालकांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. सूरज सुधाकर पाटील (२४) आणि सचिन राजू पवार (२३) अशी या दोघा लुटारूंची नावे असून, त्यांनी लुटलेले दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा एक लाख ४६ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला सूरज पाटील हा खारघर सेक्टर-१३ मध्ये, तर त्याचा सहकारी सचिन पवार हा खालापूर येथे राहाण्यास आहे. हे दोघेही खारघरमध्ये रिक्षा चालवायचे, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी संधी साधून प्रवाशांच्या अंगावरील दागिने लुटायचे. अशाच प्रकारे या दोघांनी खारघर सेक्टर-११मध्ये राहाणाºया श्रेयस पवार (२८) या तरु णासोबत भाड्याच्या कारणावरून वाद घालून त्याच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ५० हजार रु पये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले होते.
या प्रकरणी खारघर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार खिलारे, बाबाजी थोरात, पोलीस नाईक नेवारे, म्हात्रे, कान्हू, पोलीस शिपाई मिसाळ आदीच्या पथकाने या घटनेतील आरोपी रिक्षाचालकांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेऊन दोन दिवसांत या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी बालभारती शाळेजवळ तरु णाला लुटल्याची त्या प्रमाणे एका महिलेच्या गळ्यातील दागिने लुटल्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली. त्याचप्रमाणे या दोघांनी लुटलेले ११ ग्रॅम वजनाची व सात ग्रॅम वजनाच्या ३६ हजार रु पये किमतीच्या दोन अर्धवट तुटलेल्या सोन्याच्या चेन तसेच दागिने लुटण्यासाठी दोघा लुटारूंनी वापरलेली रिक्षा, असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील सूरज पाटील याच्यावर बलात्कार, चोरी व मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी दिली.