शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पनवेलमध्ये राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 1:00 AM

पनवेलमध्ये राज्यस्तरीय ४० व्या खाशाबा जाधव राज्यव्यापी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सुरु वात झाली. शुक्रवारी या स्पर्धेकरिता राज्यभरातील पहिलवानांचे आगमन

पनवेल : पनवेलमध्ये राज्यस्तरीय ४० व्या खाशाबा जाधव राज्यव्यापी कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला शनिवारी सुरु वात झाली. शुक्रवारी या स्पर्धेकरिता राज्यभरातील पहिलवानांचे आगमन पनवेलमध्ये झाले होते. ज्युनियर आणि सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी १५०० पहिलवान असणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर येथील कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत दाखल झाले होते.के. व्ही. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्फूर्ती गीत गायले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण संपन्न झाले. दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन संपन्न झाले. या वेळी मार्गदर्शन करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, माजी आमदार दत्तू पाटील क्र ीडा नगरीत सगळ्यांचे स्वागत करतो. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचा पदाधिकारी झाल्यानंतर माझा आणि कुस्तीचा संबंध आला, हे प्रांजळपणे मान्य करतो. विद्यार्थीदशेत मी या खेळाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. परंतु रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतल्या या रांगड्या खेळाला प्राधान्य देण्यासाठी मी खेळाडूंना खावटी, प्रवास भत्ता आणि कीट देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करवून घेतली. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या खेळांचा वाटा आहे त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. व्ही. के. हायस्कूल, के.व्ही. कन्या विद्यालयांनी माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयातील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन खेळाडूंचे भोजन व निवास यांची सोय केली आहे. कुस्ती या खेळाला ऊर्जितावस्था मिळवून देणे आणि उदयोन्मुख खेळाडूंना कुस्तीकडे आकर्षित करणे हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी आमदार विवेक पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पमपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, मारुती अडकर, नामदेवराव मोहिते, नवी मुंबई महापौर जयवंत सुतार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. जयाजी नाथ आदी मान्यवरांसह हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.