नवी मुंबई महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त कलाविष्कार
By admin | Published: January 3, 2017 05:46 AM2017-01-03T05:46:02+5:302017-01-03T05:46:02+5:30
महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे गायन,
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विष्णुदास भावे नाट्यगृहात अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे गायन, नृत्य असे विविध कलाविष्कार सादर करण्यात आले. यावेळी आयोजित स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या कुटुंबाकरिता आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नृत्य स्पर्धेत रवी जाधव समूह यांनी नृत्यात प्रथम क्र मांक संपादन केला. इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र समूहाने व्दितीय क्र मांक तर पूर्वा राऊत यांनी तृतीय क्र मांक पटकाविला.अभिमान जगताप व स्मिता म्हात्रे यांच्या नृत्याला व गोपाळ राठोड यांना उत्तम नृत्याकरिता उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
गायन स्पर्धेत गणेश देशमुख यांनी प्रथम क्र मांक, हर्षा शेजवळ यांनी व्दितीय क्र मांक व राज भोईर यांनी तृतीय क्र मांक पटकाविला. जान्हवी पाटणकर व सूरज म्हात्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कॅरम स्पर्धेतील पुरु ष गटात उमेश जुनगरे विजेते तर हेमंत म्हात्रे उपविजेते ठरले. कॅरम महिला गटात मनिषा पवार विजेत्या तसेच सुनंदा कांबळे उपविजेत्या ठरल्या.
बुध्दिबळ स्पर्धेतील पुरु ष गटात संकेत सावंत हे विजेते आणि नवनाथ खेडकर उपविजेते पदाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे बुध्दिबळ स्पर्धेतील महिला गटात दिव्या सावंत विजेत्या तसेच ज्योती घनवते उपविजेत्या ठरल्या. रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकसंस्कृतीचे गीत, नृत्यातून भव्यतम दर्शन घडविणाऱ्या नागरिकांकरिता आयोजित करण्यात आलेल्या कलश एंटरटन्टेटमेंट प्रस्तुत कलाधिष्ठित महाराष्ट्र या वाद्यवृंदाच्या विशेष कार्यक्र माला रसिकांची दाद मिळाली.