ऐरोलीत आजपासून ‘भारत महोत्सव’
By admin | Published: January 13, 2017 06:19 AM2017-01-13T06:19:55+5:302017-01-13T06:19:55+5:30
देशाची संस्कृती जोपासणाऱ्या तसेच महोत्सवातून एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या भारत महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे
नवी मुंबई : देशाची संस्कृती जोपासणाऱ्या तसेच महोत्सवातून एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या भारत महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी नवी मुंबईकरांचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता, याही वर्षी ऐरोली सेक्टर ८ ए येथील विब्ग्योर शाळेच्या मैदानावर तीन दिवसीय भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पालखी सोहळ््याने या महोत्सवाचा शुभारंभ केला जाणार आहे. महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे आणि ठाणे लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवात शुक्रवारी सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार दादूस चौधरी यांचा ‘दादूस आला रे’ या आॅर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी १४ जानेवारीला लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने ‘संगीत मेला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान महिलांकरिता लकी ड्रॉद्वारे पैठणी रांगोळी प्रदर्शन, तसेच विविध चित्रकृ तींच्या प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राजीव स्पोर्टस् अकॅडमीचे विशेष सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)