पाऊस जाताच धुळीकणांचे पुन्हा आगमन, पाणी फवारणीही मंदावली

By नामदेव मोरे | Published: November 30, 2023 01:23 PM2023-11-30T13:23:38+5:302023-11-30T13:26:13+5:30

प्रदुषण थांबविण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान

As soon as the rain goes away, the dust particles come back, the water spray also slows down | पाऊस जाताच धुळीकणांचे पुन्हा आगमन, पाणी फवारणीही मंदावली

पाऊस जाताच धुळीकणांचे पुन्हा आगमन, पाणी फवारणीही मंदावली

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे नवी मुंबईमधील प्रदुषणाची पातळी कमी झाली होती. परंतु पाऊस थांबताच हवेतील धुळीकणांचे प्रमाण मर्यादेबाहेर गेले असून दुशीत हवेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवार व मंगळवा समाधानकारक होता. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे हवेतील धुळीकण गायब झाले होते. जवळपास प्रत्येक विभागातील स्थिती समाधानकारक होती. परंतु बुधवारपासून पुन्हा धुळीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे.गुरूवारी कोपरी परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक २६४ वर पोहचला होता. कळंबोलीमध्ये २२१ व तळोजामध्ये हेच प्रमाण १२८ वर गेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने रस्ते धुण्यास सुरुवात केली आहे. परंतु दोन वाहनांच्या सहाय्याने रोज ५५० किलोमीटर लांबीचे रस्ते कसे धुवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये रस्ते साफ करण्याची काहीच सोय नाही. सायन पनवेल महामार्गावरही रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी काहीच यंत्रणा नसून याचा परिणाम प्रदुषणावर होत आहे.

शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक

विभाग - २८ नोव्हेंंबर - ३० नोव्हेंबर

  • कोपरी - १४७ - २६४
  • महापे ९४ - ११७
  • नेरूळ ५७ - ८०
  • कळंबोली ७२ - २२१
  • तळोजा ६५ - १२८

Web Title: As soon as the rain goes away, the dust particles come back, the water spray also slows down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.