कोणत्याही क्षणी मंत्रालयामध्ये आत्मदहन करणार, अश्विनी बिद्रे-गोरे कुटुंबीयांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 01:02 PM2018-05-24T13:02:05+5:302018-05-24T13:03:37+5:30
एपीआय अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती हाती स्पष्ट होत नाही, कोणत्याही प्रकारची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवता नाहीत, मुख्यमंत्री भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप राजू गोरे यांनी केले आहेत.
नवी मुंबई - एपीआय अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती हाती स्पष्ट होत नाही, कोणत्याही प्रकारची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवता नाहीत, मुख्यमंत्री भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप राजू गोरे यांनी केले आहेत. अश्विनी बिद्रे गोरे हत्ये प्रकरणात कुटुंबीयांनी 5 नवीन मागण्या केल्या असून यामध्ये सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी, सदर केसच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, एसीपी संगीता अल्फान्सो यांची अंतिम सुनावणी होईपर्यंत तपासाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, आमच्या कुटुंबीयांचे बरे वाईट झाल्यास मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यात यावे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे आजही आरोपींना वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागण्या अश्विनी बिद्रे गोरे कुटुंबीयांनी केल्या आहेत.