अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण: खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी, ज्ञानदेव पाटीलची सुनावणी पनवेल न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:54 AM2017-12-12T00:54:53+5:302017-12-12T00:55:09+5:30

बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला नवी मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. त्याला पनवेल न्यायालयाने सोमवारी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ashwini Bidre missing case: Khadseen's brother gets police closet, Gyanadeo Patil hearing in Panvel court | अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण: खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी, ज्ञानदेव पाटीलची सुनावणी पनवेल न्यायालयात

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण: खडसेंच्या भाच्याला पोलीस कोठडी, ज्ञानदेव पाटीलची सुनावणी पनवेल न्यायालयात

googlenewsNext

नवी मुंबई : बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ताप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रेय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला नवी मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. त्याला पनवेल न्यायालयाने सोमवारी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबई पोलीस मुख्यालयात नागरी संरक्षण विभागात बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना संगणकात मिळालेल्या व्हिडीओमध्ये अश्विनी यांना पोलीस निरीक्षक अभय कुरु ंदकर यांनी मारहाण आणि धमकी दिल्याचे आढळून आले.
त्यानुसार त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाचे निर्देश आणि माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर कुरु ंदकर याला अटक करण्यात आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला नवी मुंबई पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले. तपासात अश्विनी, कुरुंदकर आणि पाटील हे तिघे जण भार्इंदर येथे एका लोकेशनला असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर अभय कुरूंदकर राजेशला वारंवार फोन करीत असल्याचे सीडीआरवरून स्पष्ट झाले. कुरूंदकरनी राजेशला अंधेरीवरून त्वरित भार्इंदरला बोलावून घेतले असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी त्याला अटक केली.
न्याय दंडाधिकाºयांसमोर झालेल्या सुनावणीत आरोपीचे वकील देवेंद्र पाटेकर यांनी टॉवर लोकेशन हे तीन कि.मी. क्षेत्रातील रेडिशन असते. त्यामुळे ते तिघे एकत्रित आले असे म्हणण्याला तांत्रिकदृष्ट्या कोणताही आधार नसल्याचा युक्तिवाद केला.
तर सरकारी पक्ष आणि तपास यंत्रणांनी सीडीआर सादर केला. त्याचबरोबर पाटील याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ज्ञानदेव पाटीलला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कुरुंदकरशी घनिष्ट मैत्री
राजेश पाटील हा भाजपा युवा मोर्चाचा भुसावळ तालुका अध्यक्ष आहे. तो शासकीय बांधकाम, इलेक्ट्रिकल फिडिंग ठेकेदार म्हणून काम करीत आहे. तसेच अनेक बड्या हस्तींबरोबर तो भागीदारीत व्यवसाय करीत आहे. कुरुंदकर व त्याची २० वर्षांपासून मैत्री आहे. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय आहे.

सांगलीच्या माजी नगरसेवकावर संशय : ब्रिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवºयात सापडला आहे. अटकेतील पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरच्या तो संपर्कात होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम्यान, सांगली व कुपवाडच्या चार व्यापाºयांनाही पोलिसांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलाविले आहे. या माजी नगरसेवकाची कुरुंदकरशी चांगली जवळीक होती. कुरुंदकरने त्याचा सांगलीतील फ्लॅट अश्विनी यांना राहण्यास दिला होता. तसेच अश्विनी बेपत्ता झाल्या, त्यावेळी हा माजी नगरसेवक कुरुंदकरच्या संपर्कात होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली आहे.

Web Title: Ashwini Bidre missing case: Khadseen's brother gets police closet, Gyanadeo Patil hearing in Panvel court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा