अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; राजू पाटील याचा जामीन पुन्हा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:42 PM2021-09-25T12:42:33+5:302021-09-25T12:43:21+5:30
जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला.
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील उर्फ ज्ञानदेव पाटील याचा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई याच्यासमोर जामीन अर्जबाबतची सुनावणी १५ रोजी पूर्ण झाली.
जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. राजू याने पहिला जामीन अर्ज २०१८ चा दाखल केला होता. तो २८ सप्टेंबर २०१८ रोजी मी रद्द करण्यात आला होता. देशात लॉकडाऊन असतानाही न्यायालयाने साक्षीदार तपासले आहेत. आरोपीचे वकीलसुध्दा या काळात हजर होते. हे रोजनाम्यावरून दिसते. त्यामुळे खटल्याला उशीर झाला असल्याचे कारण योग्य नसल्याचे सांगत. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर सांगितले की, सरकार पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा उशीर झालेला नाही आणि वेळेवर सुनावणी सुरू आहे. आरोपी जाणीवपूर्वक उशीर केल्याचे कारण कोर्टासमोर ठेवून न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले.