डांबर प्लान्टला लागलेल्या आगीमुळे दोन हजार रहिवाशांचे स्थलांतर; अनेक झोपड्या, वाहने खाक
By नारायण जाधव | Published: September 8, 2022 11:09 PM2022-09-08T23:09:28+5:302022-09-08T23:10:33+5:30
खबरदारी म्हणून येजा करणाऱ्या रस्ता बंद केला आहे.
नवी मुंबई - ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमध्ये जीएल कंपनीच्या डांबर प्लांटच्या टाक्यांमध्ये स्फोट, झोपड्यांनाही भीषण आग लागली असून दोन हजाराहून अधिक रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर केले आहे. यात ड्रमधील रसायन भरपावसातही पेट घेत असल्याने आग अधिक भडकली. खबरदारी म्हणून येजा करणाऱ्या रस्ता बंद केला आहे.
या भीषण आगीत अनेक झोपड्यांसह मोटरसायकल्स, स्कूटर, रिक्षा. डंम्पर, ट्रकसह काही कारचे ही मोठे नुकसान झाले आहेत. यातील अनेक वाहने खाक झाली आहेत. नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन जवान आग विझविण्याचे प्रयत्न अथक प्रयत्न केले. तुर्भे बोंनसरी गाव तुर्भे एमआयडीसी जी एन कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या डांबर बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती घटनास्थळी पवने एमआयडीसी अग्निशमन दल कोपरखैरणे अग्निशमन दल व वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली असून घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नवी मुंबई- तळोजामधील मोदी केमीकल कंपनीला भीषण आग, कंपनी जळून खाक pic.twitter.com/AFfGxffp9q
— Lokmat (@lokmat) September 8, 2022
तळोजात ही कंपनी खाक
तळोजा एमआयडीसीतील मोदी फार्मा कंपनीला मोठी आग लागली. दोन वर्षांपूर्वीही या कंपनीत मोठी आग लागली होती.