आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून हल्ला; नेरूळमध्ये हाणामारी, दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:24 PM2024-03-06T14:24:53+5:302024-03-06T14:25:34+5:30

याप्रकरणी साहिल परघरमोर (२२), विनोद कांबळे (१९) यांना अटक केली असून, आणखी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.

Assault on suspicion of stealing mother's money; Clash in Nerul: Two arrested | आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून हल्ला; नेरूळमध्ये हाणामारी, दोघांना अटक 

आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून हल्ला; नेरूळमध्ये हाणामारी, दोघांना अटक 

नवी मुंबई : आईचे पैसे चोरल्याच्या संशयातून नेरूळ येथे एका तरुणावर टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यावेळी ‘पार्किंग’मधील कर्मचारी व इतरांच्या मदतीने जखमींचे प्राण वाचले होते, तर हल्ला करणाऱ्या एकाला पकडले होते. हे सर्वजण चेंबूरचे असून, केवळ हल्ल्याच्या उद्देशाने एकाचा पाठलाग करत रेल्वेने नेरूळला आले होते. 

    याप्रकरणी साहिल परघरमोर (२२), विनोद कांबळे (१९) यांना अटक केली असून, आणखी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. 
नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. तेथे हर्ष खरे (२०) याच्यावर काहीजण कोयता, दांडके व दगडाने हल्ला करीत होते. त्यामुळे हर्ष बचावासाठी धावत एका वाहनाखाली घुसला. तेथेही हल्लेखोर त्याच्यावर वार करीत होते. हा प्रकार पाहून तिथल्या ‘पे ॲण्ड पार्किंग’मध्ये काम करणाऱ्या मुकीम उस्मानी याने आरडाओरडा करत त्याच्या बचावासाठी धाव घेतली. 

कायमचा काटा काढण्याचा होता डाव
  हर्ष याने आपल्या आईचे पैसे चोरून तिची छेड काढल्याचा साहिल याचा आरोप आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. मात्र, या प्रकरणात साहिल हा हर्षचा कायमचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो संधीच्या शोधात असताना शनिवारी रात्री हर्ष हा पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना दिसला. 
  याचवेळी साहिलदेखील त्याच्या साथीदारांसह बॅगेत कोयता घेऊन त्याच लोकलमधून त्याच्या पाठोपाठ आला होता. नेरूळ स्थानकात हर्ष उतरून स्थानकाबाहेर निघताच साहिल व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे थोडक्यात हर्षचे प्राण वाचले.

 हल्ला झाला त्यावेळी इतर नागरिक धावून आले. हल्लेखोर पळू लागले. यामुळे मुकीम याने पळणाऱ्या एकाच्या दिशेने बांबू फेकून त्याला पाडून पकडून ठेवले. या घटनेनंतर पोलिसांनी हर्ष याला रुग्णालयात दाखल केले.
 

Web Title: Assault on suspicion of stealing mother's money; Clash in Nerul: Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.