"आमच्या दाराशी, हाय शिमगा" : उरणमध्ये होळीकोत्सोवाचे सप्तरंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:08 PM2023-03-06T20:08:15+5:302023-03-06T20:08:22+5:30
होळीला अर्पण केल्या पापलेटच्या माळा !
उरण : आगरी कोळ्यांची परंपरा असलेल्या उरणमध्ये ठिक ठिकाणी होळीकोत्सोवात सप्तरंग भरले होते.परिसरातील आगरी वस्त्या आणि कोळीवाडे
डीजे, लाऊडस्पिकरच्या " आमच्या दाराशी, हाय शिमगा " च्या ताळात दणाणले आहेत परिसरातील नागरिकांनी ठिक ठिकाणी होळीचा आनंद लुटला.
होळीचा उत्सव म्हणजे येथील आगरी-कोळ्यांचा एक पारंपरिक सण.उरण परिसरातील करंजा, मोरा आदी कोळीवाडे आणि विविध मासेमारी बंदरात व समुद्रकिनारी राहणारे आगरी- कोळी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. वर्षभर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणारे आगरी - कोळी बांधव हे व्यवसायानिमित्त कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहतात. पण, होळीच्या सणानिमित्त मच्छिमार बांधव हे आपल्या होड्या घेऊन हमखास घरी माघारी परततात. यावेळी मच्छिमार होड्यांची पूजा करतात. होड्याना फुलं,रंगीबेरंगी पताकांचे तोरण लावून सजवल्या जातात.आणि समुद्रात कुटुंब, नातेवाईकांसह फेर फटका मारुन होळीचा हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतात.
सोमवारीही उरण परिसरातील मोरा, करंजा बंदरात होळीचा पारंपरिक सण मच्छीमारांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.परिसरातील आगरी वस्त्या आणि कोळीवाडे डीजे, लाऊडस्पिकरच्या " आमच्या दाराशी, हाय शिमगा " च्या ताळात दणाणले आहेत. परिसरातील नागरिकांनी ठिक ठिकाणी विशेषतः करंजा येथील होळी सभोवार फेर धरूनपापलेटच्या माळाही होळीला अर्पण केल्या आणि होळीचा मनसोक्त आनंद लुटला.